सहज फिराया आलेला सासरला श्रावण.
करवंदीने रिमझिमणारा स्मरला श्रावण
घाटा घाटा वरुनी मग वावरला श्रावण
संसाराची अक्कल नाही ना त्याला घर
माहित होते सगळे मग का वरला श्रावण?
फोलच काड्या ती वेडी जोडत बसलेली
छत्र्यांना ना आजवरी आवरला श्रावण
डोळे तेव्हा आठवणींचे नभ बनलेले
सहज फिराया आलेला सासरला श्रावण.
ती रडताना गालावर स्वप्ने ओघळली
हरला, खचला, थरथरला बावरला श्रावण.
- ह. बा. शिंदे
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 09/06/2010 - 15:15
Permalink
वा. एकंदर छान झाली आहे रचना.
वा. एकंदर छान झाली आहे रचना.
ह बा
बुध, 09/06/2010 - 15:21
Permalink
चित्तरंजनजी, स्मरला बद्दल
चित्तरंजनजी,
स्मरला बद्दल (एकुण मात्रा मोजण्याबद्दल) जरा कन्फ्युज होतो. पण चुकलेली नाही हे कळल्याने आनंद झाला.
प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!!
प्रणव.प्रि.प्र
बुध, 09/06/2010 - 16:31
Permalink
हबा. चांगली झाली आहे रचना
हबा.
चांगली झाली आहे रचना आवडली. मस्त.
डोळे तेव्हा आठवणींचे नभ बनलेले
सहज फिराया आलेला सासरला श्रावण.
आवडला.
शुभेच्छा
कैलास
बुध, 09/06/2010 - 17:42
Permalink
मस्त झाली आहे.... ती रडताना
मस्त झाली आहे....
ती रडताना गालावर स्वप्ने ओघळली
हरला, खचला, थरथरला बावरला श्रावण.
हा शेर विशेष भावला.
डॉ.कैलास
ह बा
बुध, 09/06/2010 - 17:49
Permalink
प्रणव.प्रि.प्रजी, प्रतिसादाबद
प्रणव.प्रि.प्रजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
कैलासजी?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
ज्ञानेश.
गुरु, 10/06/2010 - 08:24
Permalink
छान छान. दुसरा, चवथा आणि
छान छान.
दुसरा, चवथा आणि पाचवा शेर विशेष.
शुभेच्छा.
ह बा
गुरु, 10/06/2010 - 12:57
Permalink
धन्यवाद ज्ञानेशजी.
धन्यवाद ज्ञानेशजी.
आनंदयात्री
गुरु, 10/06/2010 - 22:03
Permalink
फोलच काड्या ती वेडी जोडत
फोलच काड्या ती वेडी जोडत बसलेली
छत्र्यांना ना आजवरी आवरला श्रावण
सुंदर कल्पना...
क्रान्ति
गुरु, 10/06/2010 - 22:34
Permalink
सुरेख! छत्र्यांचा शेर खासच!
सुरेख! छत्र्यांचा शेर खासच!
ह बा
शुक्र, 11/06/2010 - 10:52
Permalink
आनंदयात्रीजी, क्रान्तिजी प्रत
आनंदयात्रीजी,
क्रान्तिजी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
अनिल रत्नाकर
शुक्र, 11/06/2010 - 14:51
Permalink
ह.बा. हजार बार वाचली
ह.बा.
हजार बार वाचली गझल.
हरला, बावरला नाही श्रावण
करवंदीने रिमझिमणारा
आठवणींचे नभ
आवडले.
ह बा
शुक्र, 11/06/2010 - 16:23
Permalink
अनिल रत्नाकरजी, प्रतिसाद
अनिल रत्नाकरजी,
प्रतिसाद वाचून हुरूप आला. बरे वाटले.
धन्यवाद!
प्रशान्त वेळापुरे
मंगळ, 15/06/2010 - 12:45
Permalink
फोलच काड्या ती वेडी जोडत
फोलच काड्या ती वेडी जोडत बसलेली
छत्र्यांना ना आजवरी आवरला श्रावण
मस्त !
प्रशांत
ह बा
मंगळ, 15/06/2010 - 17:31
Permalink
प्रशान्त
प्रशान्त वेळापुरेजी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!