गरीबाला कुठे सांगा कुणाला टाळणे येते?
सरावाने अता त्या वेदना सांभाळणे येते
जरी झडले बहर सारे तरी गंधाळणे येते
खरे आहे मला रडणे तसे जमलेच नाही हे
अता दुखर्या नभाखाली असे रेंगाळणे येते
जगाला माहिती आहे मला चकवून गेली ती
गरीबाला कुठे सांगा कुणाला टाळणे येते?
तुला रडवेल हे जगणे नको सोडूस आईला
न करता पापणी ओली तिला हाताळणे येते
दिवाण्यांच्या समूद्राशीच भिडला जन्म हा माझा
गरजणे ना कधी जमले परी फेसाळणे येते
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
सोम, 07/06/2010 - 19:10
Permalink
कशी ही प्रेयसीइतकी करंटी
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
छान आहे. सत्य आहे.
कैलास
मंगळ, 08/06/2010 - 09:23
Permalink
सरावाने अता त्या वेदना
सरावाने अता त्या वेदना सांभाळणे येते
जरी झडले बहर सारे तरी गंधाळणे येते
दिवाण्यांच्या समूद्राशीच भिडला जन्म हा माझा
गरजणे ना कधी जमले परी फेसाळणे येते
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
हे शेर मस्तच...
गझल आवडली.... ह बा... लगे रहो...
डॉ.कैलास
बेफिकीर
मंगळ, 08/06/2010 - 09:33
Permalink
वृत्त हाताळणी, मतला व अनेक
वृत्त हाताळणी, मतला व अनेक ओळी आवडल्या.
अभिनंदन ह.बा.!
आनंदयात्री
मंगळ, 08/06/2010 - 09:59
Permalink
तुला रडवेल हे जगणे नको सोडूस
तुला रडवेल हे जगणे नको सोडूस आईला
न करता पापणी ओली तिला हाताळणे येते
वा...
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
:-) very true!!
शुभेच्छा!
ह बा
मंगळ, 08/06/2010 - 10:14
Permalink
अजयजी प्रतिसादाबद्दल आभारी
अजयजी प्रतिसादाबद्दल आभारी आहे. धन्यवाद!
कैलासजी आभारी आहे प्रतिसादाबद्दल. धन्यवाद!
बेफिकीरजी आहे प्रतिसादाबद्दल आभारी. धन्यवाद!
आनंदयात्रीजी आहे आभारी प्रतिसादाबद्दल. धन्यवाद!
चित्तरंजन भट
मंगळ, 08/06/2010 - 13:34
Permalink
सरावाने अता त्या वेदना
सरावाने अता त्या वेदना सांभाळणे येते
जरी झडले बहर सारे तरी गंधाळणे येते
वा! अता त्या ऐवजी अताशा असे वाचून बघितले.
गरीबाला कुठे सांगा कुणाला टाळणे येते?
चांगली ओळ.
निलेश कालुवाला
मंगळ, 08/06/2010 - 14:22
Permalink
कशी ही प्रेयसीइतकी करंटी
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
शेर फारच आवडला.
प्रणव.प्रि.प्र
मंगळ, 08/06/2010 - 14:43
Permalink
हबा, खरे आहे मला रडणे तसे
हबा,
खरे आहे मला रडणे तसे जमलेच नाही हे
अता दुखर्या नभाखाली असे रेंगाळणे येते
हा शेर अंधुक वाटला पण आवडला.
सरावाने अता त्या वेदना सांभाळणे येते
जरी झडले बहर सारे तरी गंधाळणे येते
मतला पण मस्त.
शुभेच्छा.
ह बा
मंगळ, 08/06/2010 - 15:43
Permalink
@चित्तरंजनजी, सरावाने अता
@चित्तरंजनजी,
सरावाने अता त्या वेदना सांभाळणे येते
जरी झडले बहर सारे तरी गंधाळणे येते
वा! अता त्या ऐवजी अताशा असे वाचून बघितले.
आपण जसे वाचले तेच अधिक वाचनीय वाटते आहे.
प्रतिसादबद्दल धन्यवाद!
निलेशजी,
आपल्याला आवडलेला शेर माझाही आवडता शेर आहे.
प्रतिसादबद्दल धन्यवाद!
@प्रणव.प्रि.प्रजी,
खरे आहे मला रडणे तसे जमलेच नाही हे
अता दुखर्या नभाखाली असे रेंगाळणे येते
हा शेर अंधुक वाटला पण आवडला.
अंधुक वाटला याचा अर्थ मी पटकन भिडला नाही असा घेतला. त्या शेरावर नव्याने विचार करेन.
प्रतिसादबद्दल धन्यवाद!
प्रणव.प्रि.प्र
मंगळ, 08/06/2010 - 17:01
Permalink
हबा, अंधुक वाटला म्हणजे
हबा,
अंधुक वाटला म्हणजे तुम्हाला जे सांगायचे आहे ते कळतेय पण तरी अजून स्पष्टपणे आल्यास मजा येईल.
ता.क. आता वाचताना वाटतेय की त्या अंधुकतेमुळेपण मजा येतेय. चांगलंय.
तरीही विचार करा जरूर. नक्की. अच्छा.
वामन
बुध, 09/06/2010 - 16:28
Permalink
जगाला माहिती आहे मला चकवून
जगाला माहिती आहे मला चकवून गेली ती- अतिसामान्य ओळ.
गरीबाला कुठे सांगा कुणाला टाळणे येते?- उत्तम ओळ.
हणमंता बाबा गडबड नको करू. प्रत्येक ओळीला वेळ दे.
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
कल्पना नवी वाटत नाही पण शब्दांच्या जागा आणि सहजतेमुळे चांगला वाटतो आहे असे माझे मत आहे.
बरी आहे गझल.
ह बा
मंगळ, 15/06/2010 - 15:57
Permalink
@प्रणवजी खरे आहे मला रडणे तसे
@प्रणवजी
खरे आहे मला रडणे तसे जमलेच नाही हे
अता दुखर्या नभाखाली असे रेंगाळणे येते
आता गझलेतील या शेरात मी कसलाही बदल करणार नाही. तरिही मी विचार केला. त्यानंतर हे सुचले.
जरी नाही मला जमले तसे रडणे उमाळ्याने
तरी दुखर्या नभाखाली असे रेंगाळणे येते
???
प्रणव.प्रि.प्र
मंगळ, 15/06/2010 - 16:23
Permalink
हबा, मला तरी पहिलाच आवडला.
हबा,
मला तरी पहिलाच आवडला. अंधुकतेतली मजा!! :-)
ह बा
बुध, 16/06/2010 - 15:06
Permalink
अंधुकतेतली मजा!! :-) अंधुकतेत
अंधुकतेतली मजा!! :-)
अंधुकतेत मजा असतेच म्हणा!!! असो. प्रणवजी आपले माझ्या लिखाणाकडे लक्ष आहे, सुधारणा सुचवत आहात याचा आनंद आहे. (या कविने केलेला नवा शेरही वाइट नाही. माझे मत) धन्यवाद!
वामन
बुध, 16/06/2010 - 15:27
Permalink
कशी ही प्रेयसीइतकी करंटी
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
छान शेर आहे.
प्रशान्त वेळापुरे
शुक्र, 18/06/2010 - 16:15
Permalink
जगाला माहिती आहे मला चकवून
जगाला माहिती आहे मला चकवून गेली ती
गरीबाला कुठे सांगा कुणाला टाळणे येते?
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
शेर आवडले !
शुभेच्छा.
ह बा
शुक्र, 18/06/2010 - 18:41
Permalink
वा मनजी, जे सांगीतलत, बोललात,
वा मनजी,
जे सांगीतलत, बोललात, ते सर्व मान्य. अमलात आणण्याचा प्रयत्न करेन.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
प्रशांतजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
कैलास गांधी
गुरु, 22/07/2010 - 12:35
Permalink
कशी ही प्रेयसीइतकी करंटी
कशी ही प्रेयसीइतकी करंटी जाहली मदिरा
मने शमवीत जाताना हिला घर जाळणे येते
हे शेर मस्तच..
बहर
शुक्र, 23/07/2010 - 00:28
Permalink
हबा... ही गझल कुठे होती इतके
हबा... ही गझल कुठे होती इतके दिवस???? मला पत्ताच नाही! भन्नाट!! दुसरा शब्दच नाही! सगळे शेर प्रचंड आवडले!!! तोडलंस भावा... असं आता मी ही म्हणतो! तितक्याच मनापासून! वावा...
ह बा
शुक्र, 23/07/2010 - 10:25
Permalink
गांधीजी, धन्यवाद! बहर,
गांधीजी, धन्यवाद!
बहर, धन्यवाद!