श्वास झालो

मी कळ्यांचा श्वास झालो
की फुलांचा वास झालो

ह्या सुगंधा चाखताना
भ्रुंग मी नावास झालो

सावलीला सोडले मी
मी उन्हाचा त्रास झालो

पाहता ती मुग्ध अदा
आज तीचा दास झालो

वाढली ती हाव माझी
मीच माझा घास झालो

लाभता सारी मला तू
आज मीही पास झालो

संपला हा शेर माझा
पात्र मी शोकास झालो

गझल: 

प्रतिसाद

वाढली ती हाव माझी
मीच माझा घास झालो

मिडास... फारच छान!

मी कळ्यांचा श्वास झालो
की फुलांचा वास झालो - सुरेख! (दोन ओळीतील संबंध काय असा प्रश्न कुणाला पडू नये अशी आशा)

सावलीला सोडले मी
मी उन्हाचा त्रास झालो (छानच)

वाढली ती हाव माझी
मीच माझा घास झालो (उत्तम)

'अदा' या शेरात एक मात्रा कमी झाली असावी. दुरुस्त करता येईलच!

आपल्या या गझलेतील ३ शेर आवडले अनिल!

पु.ले.शु.

-'बेफिकीर'!

मी कळ्यांचा श्वास झालो
की फुलांचा वास झालो - सुरेख! (दोन ओळीतील संबंध काय असा प्रश्न कुणाला पडू नये अशी आशा)

सावलीला सोडले मी
मी उन्हाचा त्रास झालो (छानच)

वाढली ती हाव माझी
मीच माझा घास झालो (उत्तम)

'अदा' या शेरात एक मात्रा कमी झाली असावी. दुरुस्त करता येईलच!

आपल्या या गझलेतील ३ शेर आवडले अनिल!

पु.ले.शु.

-'बेफिकीर'!

बर्‍याच दिवसांनी पण फार छान गझल लिहिलीत अनिल.
मतला छानच.

अजयजी, बेफिकीर्जी, ह.बा. जी,
सर्वांना मनापासुन धन्यवाद.

चार - पाच दिवसापुर्वी ही गझल लिहिली होती. पण प्रकाशित होत नाही म्हंटल्यावर वाटले, नेहमीप्रमाणे काहीतरी घोटाळा केलेला असणार म्हणून आजच परत सुधारून लिहीली होती.
घनघोर आनंद झाला.

व्वा....
अनिल आपण मला ही दूरध्वनिवर ऐकवली होती....प्रसिद्ध जरा उशिरा केलीत.....
छान गझल...

डॉ.कैलास

कैलासजी,
तुमच्या मार्गदर्शनाने थोडी सुधारणा होत आहे.
लोभ असावा.