..काय मी

माझे मला ना कळे, केले काय मी?
त्या पायरीशी कसे नेले पाय मी

का चोरला घास माझ्या त्यागातला?
ते ताक होते जळालेले, साय मी!

ना राहिली ओढ, भेटू कोणास मी?
माझ्याकडे ओढले गेले काय मी?

सैतान झालाच जागा माझ्यातला
पापाकडे ह्या जीवा, नेले, हाय! मी

त्यांनीच तो लावला लोभी सापळा
ते भोवले चोचले, मेले, काय मी?

गझल: 

प्रतिसाद

सैतान झालाच जागा माझ्यातला
पापाकडे ह्या जीवा, नेले, हाय! मी

माझे मला ना कळे, केले काय मी?

वा!!!

धन्यवाद ह बा

अनिल,
अजून खूप काफिया मिळतील. कदाचित त्यातून चांगले शेर अजून निघतील.
हा प्रयत्न ठीक.

चांगला प्रयत्न अनिल...

शेर अजून भारदस्त झाले असते...

डॉ.कैलास

सर्वांना प्रतिसादातुन प्रोत्साहनाबद्द्ल धन्यवाद.
चांगले गुण मिळविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सुचनांवर अभ्यास निश्चितच करीन.