वाट पाहे दारावरी
गोठुनी व्यापे निराशेची हवा दारावरी
वाट पाहे सांजवेळी पारवा दारावरी
सैल होता आठवांची गुंफलेली मालती
गीत गाता सांडतो गे मारवा दारावरी
हीच का ती वाट होती हीच का माझी कथा
हीच का ती मागणारी जोगवा दारावरी
पेटला वैशाख येथे पेटवोनी प्राक्तना
कोठुनी आणू सुखाचा गारवा दारावरी
तेज ओले होत जाता निर्बली झाली धुनी
प्राण ताजे फुंकणारा बोलवा दारावरी
वाट पाहे जीव माझा कैक वर्षांपासुनी
येउनी गेला कुणाचा कारवा दारावरी?
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
गुरु, 03/06/2010 - 11:43
Permalink
आहा! छान सुंदर गझल! अभिनंदन!
आहा! छान सुंदर गझल! अभिनंदन!
अजय अनंत जोशी
शुक्र, 04/06/2010 - 12:23
Permalink
कोठुनी आणू सुखाचा गारवा
कोठुनी आणू सुखाचा गारवा दारावरी
प्राण ताजे फुंकणारा बोलवा दारावरी
या ओळी छान आहेत.
वाट पाहे जीव माझा कैक वर्षांपासुनी
येउनी गेला कुणाचा कारवा दारावरी?
"कारवा" म्हणजे काय?
आदित्य_देवधर
शुक्र, 04/06/2010 - 13:43
Permalink
@अजय, कारवा हिन्दि शब्द
@अजय,
कारवा हिन्दि शब्द 'तांडा' किंवा 'ताफा' या अर्थी वापरायचा प्रयत्न केला.
धन्यवाद!
ह बा
शुक्र, 04/06/2010 - 16:23
Permalink
आवडलेला शेर : गोठुनी व्यापे
आवडलेला शेर :
गोठुनी व्यापे निराशेची हवा दारावरी
वाट पाहे सांजवेळी पारवा दारावरी
गझल छानच आहे.