माणसांना भार होती माणसे

माणसांना भार होती माणसे

माणसांना भार होती माणसे
केवढी लाचार होती माणसे!

सारखा माणूस कोठे सापडे?
आपला आकार होती माणसे

एकट्याने मी दिला माझा लढा
शेवटी येणार होती माणसे

पाहिले ज्याने तुला तो संपला
ना उगा बेजार होती माणसे

ही लढाई जिंकली बोलू कसे?
आपलीही ठार होती माणसे

बोलण्याची वेळ होती पण तरी,
नेमकी बघ गार होती माणसे

निलेश कालुवाला.

गझल: 

प्रतिसाद

ही लढाई जिंकली बोलू कसे?
आपलीही ठार होती माणसे

इथे ''आपलीही ठार झाली माणसे''.... असे अधिक चांगले वाटले असते.
असो... ठीक ठाक गझल.

डॉ.कैलास

एकट्याने मी दिला माझा लढा
शेवटी येणार होती माणसे

ही लढाई जिंकली बोलू कसे?
आपलीही ठार होती माणसे

हे दोन्ही शेर आवडले. छान गझल.
पुढील लिखाणास शुभेच्छा.

ही लढाई जिंकली बोलू कसे?
आपलीही ठार होती माणसे
वा वा!
माझ्या देव नव्हता तरी ... या गझलेतील ओळी आठवल्या
युद्ध खेळायचे कोणाबरोबर ..?
आपलेही उभे ठाकून गेले..!

एकट्याने मी दिला माझा लढा
शेवटी येणार होती माणसे
छान. (सिनेमातले पोलीस...)

ही लढाई जिंकली बोलू कसे?
आपलीही ठार होती माणसे

छान गझल!!

सर्वश्री कैलासजी,ज्ञानेशजी,अजयजी,ह बा जी आभिप्रायाबद्दल मनापासून आभार.