निराधार
लोकशाही सरकार येथे
अन् सरंजामी फार येथे
प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)
सावरावे कैसे कुणाला?
मागते मी आधार येथे
ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे
लोपला चंद्र कसा अवेळी?
करुन स्वप्न निराधार येथे
भेट झाली नाही वसंता
(होतसे का झंकार येथे?)
सूर्य गेला अस्तास पण हा
काजवा का बेजार येथे ?-सोनाली जोशी
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
बुध, 20/06/2007 - 22:10
Permalink
छान...
वेगळ्या वृत्तातील छान गझल...
प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)
सावरावे कैसे कुणाला?
मागते मी आधार येथे
ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे
लोपला चंद्र कसा अवेळी?
करुन स्वप्न निराधार येथे
हे सर्व शेर सुंदर...!
शुभेच्छा...!
प्राजु
गुरु, 21/06/2007 - 02:06
Permalink
खूप च छान..
ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे
टोच्लं मनाला..
केदार पाटणकर
गुरु, 21/06/2007 - 12:36
Permalink
छान
वेगळ्या बृत्तातली गझल.
अभिनंदन !
लोपला चंद्र कसा अवेळी?
करुन स्वप्न निराधार येथे
...आवडला.
- केदार
विसुनाना
गुरु, 21/06/2007 - 16:44
Permalink
चांगली , वेगळी गझल
सारेच शेर चांगले आहेत.
प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)
हा खासच!
जयन्ता५२
शुक्र, 22/06/2007 - 09:11
Permalink
खास!
सोनाली,
छोटा बहर मस्त जमलाय!सगळेच शेर चांगले आहेत.
जयन्ता५२
प्रज्ञा
शुक्र, 22/06/2007 - 17:00
Permalink
खरंच
प्राजुशी सहमत आहे मी. गजल आवडलि.
चित्तरंजन भट
शुक्र, 22/06/2007 - 18:48
Permalink
गझल चांगलीच
गझल चांगलीच आहे. वृत्त निवडताना काळजी घ्यावी. कुणालाही सहज लयीत म्हणता येईल असे वृत्त असावे.
पुलस्ति
शुक्र, 22/06/2007 - 19:22
Permalink
छान!
शिष्टाचार, चंद्र आणि काजवे हे शेर खूप आवडले!
-- पुलस्ति.
चक्रपाणि
शनि, 23/06/2007 - 11:16
Permalink
माझे मत
लयीबाबत चित्तंशी सहमत आहे. नेहमीचीच रूपके (जसे सूर्य-काजवा) टाळता आल्यास उत्तमच.
सावरावे कैसे कुणाला?
मागते मी आधार येथे
हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
कुमार जावडेकर
बुध, 27/06/2007 - 21:46
Permalink
काजवे
सोनाली,
लोकशाही सरकार येथे
अन् सरंजामी फार येथे
प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)
हे शेर आवडले.
काजवे (कृष्णशास्त्र्यांच्या अन्योक्तीप्रमाणे) सूर्य असताना (प्रकाशता येत नाही म्हणून) बेजार असतात. तुमचे काजवे काळाप्रमाणे बदललेले दिसतात!
- कुमार
सोनाली जोशी
शुक्र, 29/06/2007 - 07:55
Permalink
धन्यवाद
सर्वांचे आभार.
लयीविषयी खबरदारी घेईन.
चक्रपाणि,
सूर्य आणि काजवे असले तरी कल्पना वेगळी आहे. पण तरी रूपके नवीन असायला हरकत नाही. एवढा शोर्टेज नसावा:)
(ही सही नवीन दिसते, सुवर्णमयी असे टोपणनाव घेण्याआधी मी मनोगतावर पूर्ण नावानिशी आले होते त्याची आठवण झाली. )
संतोष कुलकर्णी
शनि, 30/06/2007 - 02:09
Permalink
चांगली
चांगली गझल..! पण चित्तरंजन यांनी केलेली सूचना करावी वाटते. रसिक अवघडू नये असे वृत्त असावे. नुसताच लघू-गुरूचा जुळणारा क्रम एवढ्यावे आपले समाधान होते. रसिकाचे होईल असे नाही. अभिनंदन!!