माझी आई

संस्कारांची लावन करते माझी आई
देवांचे संगोपन करते माझी आई

दु:खाच्या डोहाला बाबा घाबरताना
जगण्याचे आंदोलन करते माझी आई

घरट्यावरती आभाळाचा होतो हमला
पदराचा गोवर्धन करते माझी आई

बाबांचे परगावी येणे जाणे अस ते
सावीत्रीचे चिंतन करते माझी आई

गाईला चारा अन बाळाना माया
तुळ शीला मग वंदन करते माझी आई

-हणमंत शिंदे

गझल: 

प्रतिसाद

दु:खाच्या डोहाला बाबा घाबरताना
जगण्याचे आंदोलन करते माझी आई

वा:! मस्त शेर झालाय!

धन्यवाद ऋत्विक!

घरट्यावरती आभाळाचा होतो हमला
पदराचा गोवर्धन करते माझी आई
हं. छान आहे की!

गोवर्धन आणि आंदोलन खासच!

मलाही गोवर्धनच जास्त आवडला होता.

अजयजी धन्यवाद!
क्रान्तिजी धन्यवाद!

लगे रहो.....

वैभव,
सगळ्याच गझला वाचून घे. एकत्रीत प्रतिसाद दे सुधारणा कळव. तुझ्या इमेल वर गझला पाठवत जाइन.

गोवर्धन विशेष. कविवर्य प्रदीप निफाडकरांची माझी मुलगी आठवली.

चांगली गझल...

मला वाटतं या प्रकारच्या गझला केवळ एका विषयाभोवती केंद्रित असल्याने अगदी सहज ' निबंध' बनून जातात. अशा गझला लिहिताना, या विषया बद्दल सखोल चिंतन करून लिहिल्यास गझलेच्या ' कवितापणा'स बाधा येत नाही असे ही वाटते.

चित्तरंजनजी
कविवर्य प्रदीप निफाडकरांची माझी मुलगी ही गझल मी त्यांच्या तोंडून एकदा एकली आहे. त्यांच्या सादरीकरणाची ताकदच एवढी आहे की गझल म्हटले की मला आठवणार्‍या लोकात ते बर्‍याच वरच्या स्थानी असतात. कॉलेजला असताना एका स्पर्धेचे बक्शिसही त्यांच्या हातून मिळाले होते.