कधीच नाही
का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही
त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
जयश्री
गझल:
प्रतिसाद
कैलास
गुरु, 25/02/2010 - 16:15
Permalink
क्या बात
क्या बात है!!!!फडाड..
डॉ.कैलास
प्रताप
गुरु, 25/02/2010 - 16:23
Permalink
खुप आवडली. बंध रेशमाचे आवडले.
खुप आवडली. बंध रेशमाचे आवडले.
केदार पाटणकर
गुरु, 25/02/2010 - 16:42
Permalink
छान. जग जिंकले सदा मी, जिंकेन
छान.
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
खूप आवडला.
काही बदल कसे वाटतात, पहावे.
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेनही पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
एकाच शेरात दोनदा मी शक्यतो नसावा.
---
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही
जखमा दिल्या जगाने, त्याही बुजून गेल्या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही?
किंवा
ज्या ज्या दिल्या जगाने जखमा बुजून गेल्या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही ?
शुभेच्छा.
बेफिकीर
गुरु, 25/02/2010 - 16:55
Permalink
छान गझल! आवडली.
छान गझल! आवडली.
ऋत्विक फाटक
गुरु, 25/02/2010 - 19:34
Permalink
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
वा: अफलातून आहे!
सोनाली जोशी
शुक्र, 26/02/2010 - 21:18
Permalink
जयश्री गझलगीत म्हणून छानच
जयश्री
गझलगीत म्हणून छानच आहे. आवडले. चाल लावली तर मस्तच होईल.
पण एक गझल म्हणून तिचा आनंद घेता आला नाही कारण इतकी सुंदर लय असली तरी सगळ्या कल्पना खूप
नेहमीच्या वाटल्या. चू. भू. दे. घे.
सोनाली
कैलास
शुक्र, 26/02/2010 - 21:47
Permalink
जग जिंकले सदा मी, जिंकेनही
जग जिंकले सदा मी, जिंकेनही पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
एकाच शेरात दोनदा मी शक्यतो नसावा.
आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
शनि, 27/02/2010 - 05:26
Permalink
छान गझल! आवडली.
छान गझल! आवडली.
जयश्री अंबासकर
मंगळ, 02/03/2010 - 17:47
Permalink
धन्यवाद :) सोनाली.....तुझी
धन्यवाद :)
सोनाली.....तुझी प्रतिक्रिया परखड असली तर तिचा अगदी मनापासून स्वीकार करतेय...तू सांगितलेलं एकदम पटेश.......नक्की विचार करेन.
अजय अनंत जोशी
गुरु, 04/03/2010 - 07:52
Permalink
शेवटचा शेर आवडला. केदारने
शेवटचा शेर आवडला. केदारने सुचविलेले बदल वगैरे ठीक आहेत. पण तरीही फार भावली नाही. असो.
ह बा
मंगळ, 25/05/2010 - 17:54
Permalink
मला आवडलेला शेर : डोळ्यात
मला आवडलेला शेर :
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
उत्तम रचना.
आनंदयात्री
बुध, 26/05/2010 - 18:59
Permalink
खूप उशीरा वाचली... का घाव तू
खूप उशीरा वाचली...
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही(त)??
जखमा दिल्या जगाने, त्याही बुजून गेल्या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही?
हा केदारनी सुचवलेला बदल अधिक समर्पक वाटला...
योगेश्वर रच्चा
गुरु, 27/05/2010 - 00:30
Permalink
अतीशय सुंदर गझल आहे.
अतीशय सुंदर गझल आहे.