छल्ला

आठवण म्हणुनी मिळाला एक छल्ला
आणि ’विसरावे’ असा जोडीस सल्ला

अर्थ ’नाही’चा अता ’नाही’च आहे
मारला आहेस तू भलताच पल्ला

माणसांना देव खपवावा जरासा
देवळामध्ये कसा निर्धास्त गल्ला

भेटला मद्यालयामध्ये मला यम
मी म्हणालो ’घे’... म्हणाला ’काय मल्ला!’

शायरी हाडात लपते छानपैकी
मारते दुनिया मनावर फ़क्त डल्ला

मित्र परिवारासहित दिसतात हल्ली
काय त्या काळातला बेकार कल्ला......

काळजी केलीस तर माजेल जीवन
’बेफ़िकिर’ झालास की थांबेल हल्ला

गझल: 

प्रतिसाद

अर्थ ’नाही’चा अता ’नाही’च आहे
मारला आहेस तू भलताच पल्ला

माणसांना देव खपवावा जरासा
देवळामध्ये कसा निर्धास्त गल्ला

हे दोन्ही शेर आवडले.......
का कोण जाणे.....आपल्या इतर रचनांसारखी ही मनाला भिडली नाही.

डॉ.कैलास गायकवाड.

खुप छान. देवळामधले आवडले.

माणसांना देव खपवावा जरासा
देवळामध्ये कसा निर्धास्त गल्ला
मस्त. गझल आवडली.

आभार!

कैलासराव, सहज रचली होती. त्यामुळे....

सहज केली असलीत तर छानच आहे.
माझाही एक शेर घ्या...
नास्तिकांनो घ्या जरा ऐकून माझे...
आजही मी पाहतो रामात अल्ला..!

कैलासराव, सहज रचली होती. त्यामुळे...

रचणे आपुले सहजगत्या,प्रसवावी मज लागते
ठसणे आपुले सहजगत्या,ठसवावी मज लागते

डॉ.कैलास.

गल्ला आणि मक्ता मस्त आहेत!

काळजी केलीस तर माजेल जीवन
’बेफ़िकिर’ झालास की थांबेल हल्ला

हा शेर पटला.
बाकी सगळी गझल आवडली.

मक्ता आवडला भूषणजी...

तखल्लुस चा योग्य वापर