जपलेली हळहळ
कातरवेळी दाटुन येते जुनाट मरगळ
जुन्या वहीतुन सुटतो जेव्हा तरणा दरवळ
पाकळीत त्या निरोप तर जिरला नाही ना?
पिकलेल्या काळजास लागे हिरवी कळकळ
मला वाटले सुकून गेले दव गालीचे
पाना पाना मधून आली कानी खळखळ
तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
तरी बायको आज वाटली मजला अडगळ
किती बदलली घरे आजवर पत्ता नाही
वही तेवढी एकुलती, जपलेली हळहळ
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
शुक्र, 14/05/2010 - 13:58
Permalink
अरे वा? वही तेवढी एकुलती..
अरे वा?
वही तेवढी एकुलती.. जपलेली हळहळ! - वा वा!
गझल आवडली.
सुरेखच!
ह बा
शुक्र, 14/05/2010 - 14:16
Permalink
धन्यवाद? सुरूवात आहे. काही
धन्यवाद?
सुरूवात आहे. काही कमी अधिक झाल्यास सुचना कराव्यात ही विनंती.
क्रान्ति
शुक्र, 14/05/2010 - 19:49
Permalink
सुंदर गझल! सगळ्याच द्विपदी
सुंदर गझल! सगळ्याच द्विपदी आवडल्या.
चक्रपाणि
शुक्र, 14/05/2010 - 23:09
Permalink
अडगळ वगळता बाकीची गझल आवडली.
अडगळ वगळता बाकीची गझल आवडली. छान!
ह बा
मंगळ, 18/05/2010 - 10:16
Permalink
धन्यवाद क्रान्ति धन्यवाद
धन्यवाद क्रान्ति
धन्यवाद चक्रपाणि
अजय अनंत जोशी
मंगळ, 18/05/2010 - 17:35
Permalink
किती बदलली घरे आजवर पत्ता
किती बदलली घरे आजवर पत्ता नाही
वही तेवढी एकुलती, जपलेली हळहळ
वा वा! छान!
मिल्या
सोम, 24/05/2010 - 00:04
Permalink
व्वा हळहळ मस्तच... आवडला ...
व्वा हळहळ मस्तच... आवडला ...
चित्तरंजन भट
सोम, 24/05/2010 - 16:29
Permalink
सुट्या ओळी फार छान आहेत. किती
सुट्या ओळी फार छान आहेत.
ही द्विपदी विशेष.
ह बा
सोम, 24/05/2010 - 16:48
Permalink
चित्तरंजनजी वैभवने (देशमु़ख)
चित्तरंजनजी
वैभवने (देशमु़ख) आपल्याविषयी खूप सांगीतले आहे. एकदा आपल्याशी भेट करवून देइन असेही म्हणाला आहे. तो पुण्यात आला की मी आपणास भेटायला येणार आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
शंका: मला लघू आणि गुरू याव्यतिरीक्त इतर काहीही कळत नाही (वैभव गेली दोन वर्षे सांगतो आहे तरीही.) तेव्हा *सुट्या ओळी फार छान आहेत.* म्हणजे काय?
वैभव देशमुख
बुध, 26/05/2010 - 12:29
Permalink
सुन्दर गझल..... पाकळीत त्या
सुन्दर गझल.....
पाकळीत त्या निरोप तर जिरला नाही ना?
ही ओल खासच..
चित्तरंजन भट
बुध, 26/05/2010 - 12:44
Permalink
तेव्हा *सुट्या ओळी फार छान
सुट्या ओळी फार छान आहेत हे वाक्य तसे पुरेसे स्पष्ट आहे. ओळींचा स्वतंत्रपणे विचार केल्यास त्या छान आहेत. द्विपदी आणखी चांगल्या होऊ शकतील.
ह बा
बुध, 26/05/2010 - 12:58
Permalink
आणखी एक : क्रुष्णधवल गोपिका
आणखी एक :
क्रुष्णधवल गोपिका पहाण्याचा गोडवा
हरवलाच रुखवती उखाण्याचा गोडवा
या गझलेत
भाळावर घामाच्या चमचमत्या चांदण्या
सापटीत घुंगुरत्या गाण्याचा गोडवा
असा एक शेर आहे. पहिल्या ओळीचा दुसर्या ओळीशी संबंध आहे पण तो स्पष्ट शब्दात आलेला नाही.
असे चालते का?