बोलण्याने बोलणे वाढेल आता

बोलण्याने बोलणे वाढेल आता
बोललो नाही तरी चालेल आता

देव सत्संगांमध्ये बंदिस्त झाला,
तो कसा दीनाघरी धावेल आता?

हातघाईने पुन्हा भांडून घेऊ,
काय चर्चेने गड्या साधेल आता

या नदीला पार केले पापण्यांनी,
वेदनेचा घाटही लागेल आता

पोरके याहून भीषण दुःख नाही
- कोण मज समजेल, समजावेल आता

नीज कविते, जागण्याची  वेळ झाली
अंगणी आई दिवा लावेल आता!

गझल: 

प्रतिसाद

 कोणत्या शेराला दाद द्यावी...?  संपूर्ण गझल आवडली....एकेक शेर अप्रतिम आहे....उत्कृष्ट गझल सादर केल्याबद्दल खास अभिनंदन...!

बोलण्याने बोलणे वाढेल आता
बोललो नाही तरी चालेल आता

पोरके याहून भीषण दुःख नाही
- कोण मज समजेल, समजावेल आता
सुंदर शेर...
गझल आवडली.

चित्तोपंत,
सुंदर गझल... सगळेच शेर आवडले.
बोलण्याने बोलणे वाढेल आता
बोललो नाही तरी चालेल आता... अगदी सहज मतला आहे.
देव सत्संगांमध्ये बंदिस्त झाला,
तो कसा दीनाघरी धावेल आता? - वा!
या नदीला पार केले पापण्यांनी,
वेदनेचा घाटही लागेल आता.. यातलं शब्द योजन फार आवडलं.
- कुमार

मतला मस्त! गझल आवडली

मस्त गझल! पहिले २ शेर विशेष आवडले!!
-- पुलस्ति.

गजल फारच सुंदर! पहिले दोन शेर फारच आवडले!

चित्तोपंत,
सही, सहज, सुंदर ग़ज़ल. अप्रतिम.
सर्व शेर आवडले. एखाद्याचा उल्लेख करणे योग्य नाही. मजा आली.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मज़ा आला

चित्तरंजनजी खुपच छान लिहीता तुम्ही.
खुप मजा आली वाचताना.

khupach chan." Chittaranjan sir ,khup apratim lihata tumhi"

छान ... आवडली... बऱ्याच दिवसांनी?

waa waa! baryach divasani ithe aalyach sarthak jhale

maktaa tar faar aavadalaa.

व्वा क्या बात है चित्त दा......

चित्त्या, जबरा रे..!

तात्या.