गझल : प्रा.रुपेश देशमुख

सेकंदाच्या काट्यावरती जिवास ठेवा
जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा.

हवा कशाला आनंदी आनंद नेहमी
दिवसाकाठी दोन्-चार क्षण उदास ठेवा.

लोकहिताच्या सर्व योजना खाउन टाका
कगदावरी दाखवायला विकास ठेवा.

निर्भय होउन लुटून घ्याव्या सर्व चांदण्या
पायाखाली शहारलेल्या नभास ठेवा.

निरोप घ्यावा तिचा कोरड्या डोळ्यांनी
थोडे कातर, थोडे हळवे स्वरास ठेवा.

मनातल्या अंगणात छोटे घरटे बांधा
नाव घराचे "आठवंणीचा निवास "ठेवा.

कधी कधी प्रेमळ शिक्षाही द्यायला हवी
एकदा तरी सावलीमधे उन्हास ठेवा.

प्रा.रुपेश देशमुख
९९२३०७५७४३

[रूपेश देशमुख ह्यांची ही गझल अमोल शिरसाट ह्यांनी प्रकाशित केली आहे-- विश्वस्त]

गझल: 

प्रतिसाद

उदास, निवास आणि विकास फार आवडले.

सेकंदाच्या काट्यावरती जिवास ठेवा
जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा.

सुंदर !!!

हवा कशाला आनंदी आनंद नेहमी
दिवसाकाठी दोन्-चार क्षण उदास ठेवा.

लोकहिताच्या सर्व योजना खाउन टाका
कगदावरी दाखवायला विकास ठेवा.

व्वा... क्या बात है !

डॉ.कैलास

अवांतर : गझल अमोल शिरसाट यांची की, प्रा.रुपेश यांची?

रूपेश,
मतला -
सेकंदाच्या काट्यावरती जिवास ठेवा
जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा.
मस्तच आहे.
चांगला प्रयत्न माझ्यामते. कीप इट अप. अजून वाचायला आवडेल तुमचे.

पायाखाली शहारलेल्या नभास ठेवा.

अप्रतीम!!!
झाडून सगळी गझल फाडू झालीये.

कधी कधी प्रेमळ शिक्षाही द्यायला हवी
एकदा तरी सावलीमधे उन्हास ठेवा.

सुंदर कल्पना--
प्रशांत

रूपेश देशमुख हे संकेतस्थळाचे सदस्य आहेत. म्हणून नाव बदलले आहे.

सेकंदाच्या काट्यावरती जिवास ठेवा
जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा.
वाव्वा!!

हवा कशाला आनंदी आनंद नेहमी
दिवसाकाठी दोन्-चार क्षण उदास ठेवा.
वाव्वा!!

व्वाह,.. अतिशय सुंदर गझल.
रूपेश देशमुखांची गझल फारा दिवसांनी वाचायला मिळाली.

निर्भय होउन लुटून घ्याव्या सर्व चांदण्या
पायाखाली शहारलेल्या नभास ठेवा.

वा वा वा !

अरे!! क्या बात है!

सेकंदाच्या काट्यावरती जिवास ठेवा
जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा.

हवा कशाला आनंदी आनंद नेहमी
दिवसाकाठी दोन्-चार क्षण उदास ठेवा.

कायम लक्षात राहणार्‍या ओळी..

अन...

पायाखाली शहारलेल्या नभास ठेवा.

अप्रतीम!...

हवा कशाला आनंदी आनंद नेहमी
दिवसाकाठी दोन्-चार क्षण उदास ठेवा.

- सुरेख.

निर्भय होउन लुटून घ्याव्या सर्व चांदण्या
पायाखाली शहारलेल्या नभास ठेवा.

- छान. खासकरून दुसरी ओळ.

मनातल्या अंगणात छोटे घरटे बांधा
नाव घराचे "आठवंणीचा निवास "ठेवा.

- सुंदर

कधी कधी प्रेमळ शिक्षाही द्यायला हवी
एकदा तरी सावलीमधे उन्हास ठेवा.

- वा...हीच कल्पना उलटीही छान राबविता येईल !

शुभेच्छा.

व्वा मस्त... सर्व गझल आवडली

छान गझल!

RESPECTED SIR TUMCHI GAZAL KHUP CHHAN AAHE KEEP IT UP APKA HAATH GAZAL KE FIELD KOI PAKAD NHI SAKTA AAKHIR MANZE HUE GURU K CHELE HO AAP. GD.DAY