तुकारामा..

किती आले किती गेले महाज्ञानी तुकारामा..
कुणीही पोचला नाही तुझ्या स्थानी तुकारामा..

जरी हे लाभले आम्हा विचारांचे करंटेपण..
करी श्रीमंत जगण्याला तुझी वाणी तुकारामा..

फुकाचा गर्व थोडाही तुला का स्पर्शला नाही...
शहाणे थोर आताचे किती मानी तुकारामा..

दिले तू दान अर्थाचे , खरोखर धन्य ते झाले..
किती केलीस शब्दांवर मेहरबानी तुकारामा..

अनंते ठेवले जैसे, तसा तू राहिला होता..
कसे केलेस जन्माला समाधानी तुकारामा..

प्रा. रुपेश देशमुख.
९९२३०७५७४३.

गझल: 

प्रतिसाद

कसे केलेस जन्माला समाधानी तुकारामा..

छान ओळ आहे.

दादा वाह...
क्या बात है...........

चांगली गझल रुपेशजी...

शेवटचा शेर खासच.

तेवढं त्या ''वाणी''चं का ही करता आलं तर बघा... वाणी हा काफिया चालणार नाही.

डॉ. कैलास ह्यांच्याशी सहमत.......

चांगली गझल...

झक्कास! शुभेच्छा...