कदाचित

सरेल एवढा प्रहर कदाचित
तुला पडेलही विसर कदाचित

पुन्हा कधीतरी समीप येता
तुझी वळेलही नजर कदाचित

समोरुनी तुझ्या निघून गेलो...
(तुला नसेल ही खबर कदाचित!)

करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित

अजून मी बजावतो मनाला-
नसेल उंच ते शिखर कदाचित....

बुजेल एक एवढी जखम अन
बनेल पूर्ववत शहर कदाचित

- कुमार जावडेकर

गझल: 

प्रतिसाद

अजून मी बजावतो मनाला-
नसेल उंच ते शिखर कदाचित....
वा वा !
बुजेल एक एवढी जखम अन
बनेल पूर्ववत शहर कदाचित
वा वा !

सुंदर गझल- सगळेच शेर छान आहेत.

करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित


अजून मी बजावतो मनाला-
नसेल उंच ते शिखर कदाचित....

बुजेल एक एवढी जखम अन
बनेल पूर्ववत शहर कदाचित

छान.

वाह कुमारजी !

सरेल एवढा प्रहर कदाचित
तुला पडेलही विसर कदाचित

करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित

बुजेल एक एवढी जखम अन
बनेल पूर्ववत शहर कदाचित

अप्रतीम!
तुमच्या गझल मला नेहेमीच खूप अवडतात.

वा मस्तच
मक्ता मस्तच आहे,

संपूर्ण गझल आवडली कुमार!

मस्त गझल. सगळ्याच द्विपदी उल्लेखनीय!

व्वा मस्त गझल... कदाचित ह्या रदीफ ला अगदी योग्य न्याय सगळीकडे दिलाय त्यामुळे खुमारी वाढलीय गझलेची...

समोरुनी तुझ्या निघून गेलो...
(तुला नसेल ही खबर कदाचित!) >>> व्वा क्या बात है