सजा

उदासी नसे, मौन हे बोलते
खुशाली विचारी मला रोज ते!

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

गझल: 

प्रतिसाद

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

या ओळी विशेश आवडल्या! गझल छानच आहे.

वाह!क्रान्ति,
गझल अवडली.

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

चांगले शेर..

वा..वा..!
उत्कृष्ट गझल- सगळेच शेर आवडले.

अभिनंदन.

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?

वरील तीन शेर छान! सहज आणि सोपे!