उत्तर

पुरे तुझा हा रडवेला स्वर;
चल जगण्याशी दोन हात कर!

तुझे नि माझे जमणे नाही....
जा बाई तू मला माफ कर...!

दुर्गंधी लपणार कोठवर?
जरी लावले उंची अत्तर !

मीही मित्रा ध्यास घेतला....
कितीक करशील माझा वापर?

रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?

आता असतील प्रश्नही माझे
हवे तसे मी देईन उत्तर...!

अमोल शिरसाट,
अकोला.
९०४९०११२३४
.

गझल: 

प्रतिसाद

तुझे नि माझे जमणे नाही....
जा बाई तू मला माफ कर...!

रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?

हे दोन शेर सुरेख आहेत.
एकूण गझल छान.

दुर्गंधी लपणार कोठवर?
जरी लावले उंची अत्तर !
वाव्वा!!!

रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?
वा!

अमोल, एकंदरच गझल चांगली झाली आहे.

कुठली शाळा कुठले दप्तर वाला शेर खूप आवडला.

व्वा व्वा अमोल,
रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?
...
मस्तचः
दुर्गंधी लपणार कोठवर?
जरी लावले उंची अत्तर !

रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?

व्वा !

आता असतील प्रश्नही माझे
हवे तसे मी देईन उत्तर...!

खूप छान गझल आहे!

व्वा! सगळेच शेर चांगले आहेत. मस्तच गझल!

धन्यवाद!

दुर्गंधी लपणार कोठवर?
जरी लावले उंची अत्तर !
वा वा!

रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?
वा वा!

एकंदर छान!

गझल आवडली. रानफुले खूपच मस्त!

गझल खूप खूप छान!
जबर्दस्त!
ही गझल वाचुन मला अशोक थोरात(अमरावती)यान्च्या गझलांची आठवण झाली.
विशेषतः
तुझे नि माझे जमणे नाही....
जा बाई तू मला माफ कर...!
हा शेर.अगदी सहज बोलावं अन काळजाला भिडावं असं.

(गम्मत म्हणून त्यांच्या ओळी सांगते.
एकदाच ऐकलिय ही गझल, अठवेल त्या ओळी सांगते
तुला वाटलो मी फालतू?
रूप तुझे ते चुलीत घाल तू!)

अभिनंदन!

रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?
>>> व्वा क्या बात हैं.... गझल आवडली