आयुष्य

जुनीच गणिते पुन्हा नव्याने मांडत आहे
आयुष्याची गृहीतके पडताळत आहे

जगण्याचा कोणी शिकवावा अर्थ... कुणाला?
मीही केवळ माझ्यापुरता लावत आहे

आयुष्याचा वेग विलक्षण आहे; पण मी -
अखेर त्याला अर्ध्यावरती गाठत आहे

कोण शक्यता पेरत गेले उरात माझ्या?
'चल किरणांशी खेळू'... कोंभ खुणावत आहे!

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे

गझल: 

प्रतिसाद

जगण्याचा कोणी शिकवावा अर्थ... कुणाला?
मीही केवळ माझ्यापुरता लावत आहे
वाव्वा!

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे

वाव्वा!

पुलस्ति, बऱ्याच दिवसांनी तुमची गझल आली. आनंद झाला. नेहमीप्रमाणेच चांगली झाली आहे.

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे

क्या बात है!!!
गझल आवडली पुलस्तिसाहेब.....!!!

आयुष्याचा वेग विलक्षण आहे; पण मी -
अखेर त्याला अर्ध्यावरती गाठत आहे

या शेराचा अर्थ नाही उमगला.... क्षमस्व.
बाकी गझल लाजवाब.

डो.कैलास

सुरेख गझल, पुलस्ति.
वेलकम बॅक.

बॅकलॉग भरून काढा आता ! ;-)

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे

उत्तम शेर पुलस्ती! आपल्या सगळ्याच गझला चांगल्या असतात.

बेफिकीर!

मस्त
जगण्याचा कोणी शिकवावा अर्थ... कुणाला?
मीही केवळ माझ्यापुरता लावत आहे
हा शेर खूप आवडला.

कोण शक्यता पेरत गेले उरात माझ्या?
'चल किरणांशी खेळू'... कोंभ खुणावत आहे!

कल्पना मस्त आहे...
तरी थोडी अंधुक वाटली.

पण
आयुष्याचा वेग विलक्षण आहे; पण मी -
अखेर त्याला अर्ध्यावरती गाठत आहे

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे
छानच वाहवा..

आणि सर्वात आवडलेला

जगण्याचा कोणी शिकवावा अर्थ... कुणाला?
मीही केवळ माझ्यापुरता लावत आहे

पुलस्ति,
चांगली गझल आहे तुमची.

सर्वच शेर सुंदर.

आयुष्याचा वेग आणि कोंभ सर्वाधिक आवडले...
वा...

छान झालीये! छोटी, पण सुंदर!

प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद!

सहि ,ख्ररच अगदि सुन्दर ...

मस्त गझल पुलस्ति...

बरेच दिवसांनी आलात...

जगण्याचा कोणी शिकवावा अर्थ... कुणाला?
मीही केवळ माझ्यापुरता लावत आहे

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे
>>> सुरेख

आवडलेला शेर :

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे