सुरेश भटांची कविता

मराठ्या उचल तुझी तलवार

आचार्य अत्रे यांच्या 'दैनिक मराठा'च्या पहिल्या अंकात (१५ नोव्हेंबर १९५६) मुखपृष्ठावर माझा भाऊ सुरेश ह्याची 'मराठ्या उचल तुझी तलवार' ही कविता छापण्यात आली होती. तेव्हा तो २४ वर्षाचा होता. 'दैनिक मराठा' हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुखपत्र होते. सर्वाधिक खपाचा विक्रम या दैनिकाच्या नावावर होता. महाराष्ट्राच्या निर्मितीत 'दैनिक मराठी'चा फार मोठा सहभाग होता. 'कऱहेचे पाणी' या आपल्या आत्मचरित्रात वर या कवितेची तीन कडवी प्रकाशित झालेली आहेत. आचार्य अत्र्यांनी, उदयोन्मुख तरुण, प्रतिभावान कवी, असे सुरेशचे वर्णन केले आहे. ही कविता मला शिरीष पै ह्यांचेकडेही मिळाली नाही. हे गीत श्री.

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: 

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

अमराठी लोकांनी मराठीचा आदर बाळगण्याचा आग्रह धरण्याआधी मराठी लोकांमध्ये मराठीचा अभिमान रुजवायची गरज अधिक आहे. मराठीला एका अभिमानगीताची गरज आहे.

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: 

Pages