सुरेश भटांची कविता

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: 

जगत मी आलो असा

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: 

मराठ्या उचल तुझी तलवार

आचार्य अत्रे यांच्या 'दैनिक मराठा'च्या पहिल्या अंकात (१५ नोव्हेंबर १९५६) मुखपृष्ठावर माझा भाऊ सुरेश ह्याची 'मराठ्या उचल तुझी तलवार' ही कविता छापण्यात आली होती. तेव्हा तो २४ वर्षाचा होता. 'दैनिक मराठा' हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुखपत्र होते. सर्वाधिक खपाचा विक्रम या दैनिकाच्या नावावर होता. महाराष्ट्राच्या निर्मितीत 'दैनिक मराठी'चा फार मोठा सहभाग होता. 'कऱहेचे पाणी' या आपल्या आत्मचरित्रात वर या कवितेची तीन कडवी प्रकाशित झालेली आहेत. आचार्य अत्र्यांनी, उदयोन्मुख तरुण, प्रतिभावान कवी, असे सुरेशचे वर्णन केले आहे. ही कविता मला शिरीष पै ह्यांचेकडेही मिळाली नाही. हे गीत श्री.

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: 

Pages