केला खरेपणाचा नाही विचार त्यांनी



केला खरेपणाचा नाही विचार त्यांनी
कित्येक गोड गाणी केली तयार त्यांनी

माझा मुळीच नव्हता तो प्रश्नही चुकीचा
ही उत्तरेच सारी केली हुशार त्यांनी

हातात घोषणांचे घेऊन खास फासे
हा मांडलाच आहे सारा जुगार त्यांनी

का तत्त्वनिष्ठतेच्या ते सांगतात गोष्टी
हे कोणते खिसे जे केले उदार त्यांनी !

या धूर्त धोरणांची आता कमाल झाली
राखेतुनी उद्याच्या नेली शिकार त्यांनी

उरल्या हातात तुमच्या या कोरड्याच फांद्या
त्यांच्यासेवच नेली त्यांची बहार त्यांनी

-- नीता भिसे


प्रतिसाद

माझ्या शुभेच्छा! मला नेहमीप्रमाणेच 'ते' म्हणजे कोण हा प्रश्न पडला असल्याने मी आता आपली पुढची गझल वाचायला घेतो.

वाह ...गझल एकदम रोखठोक आहे..

माझा मुळीच नव्हता तो प्रश्नही चुकीचा
ही उत्तरेच सारी केली हुशार त्यांनी

हातात घोषणांचे घेऊन खास फासे
हा मांडलाच आहे सारा जुगार त्यांनी

का तत्त्वनिष्ठतेच्या ते सांगतात गोष्टी
हे कोणते खिसे जे केले उदार त्यांनी !
 

हे  शेर आवडले....

आदरणीय नीताताई,
गझल अर्थातच छानच आहे.  पण माफ करा...
'उरल्या हातात तुमच्या या कोरड्याच फांद्या..' या ओळीत 'हतात...' असा उच्चार करावा लागत आहे....

प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०