गप्प २
जरूरी आमची इतकी जगालाही कुठे आहे?
जगाची गरज तितकीशी अम्हालाही कुठे आहे?
दहाव्याला स्वतःच्या भोजनाला माणसे येती
मिळावा मोक्ष ही इच्छा शवालाही कुठे आहे?
अरे वर्षानुवर्षे जगत आलो जन्म आपण जो
निवड 'तो घ्यायचा कोठे' कुणालाही कुठे आहे?
न देवाने दिली बुद्धी पशूला ऐकले होते
इथे लक्षात आले माणसालाही कुठे आहे?
तुम्हा प्रतिसाद माझे बोचल्याने गप्प झालो मी
तसा काट्याविना परिचय फुलालाही कुठे आहे?
किती वर पोचलो जाणुन त्याचे कर्ज फेडावे
अपेक्षा एवढी चित्ती जिन्यालाही कुठे आहे?
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
शुक्र, 24/10/2008 - 12:46
Permalink
प्रिय मित्र तिलकधारी...
अंतर्मुख करणारी रचना आहे खरोखर!
सर्वच शेर आवडले.
"न देवाने दिली बुद्धी पशूला ऐकले होते
इथे लक्षात आले माणसालाही कुठे आहे?" हा तर खासच.
शेवटच्या शेरात- 'अपेक्षा' हा शब्द तपासावा. मला याचे दोन अर्थ दिसत आहेत. एक म्हणजे- आपण किती वरपर्यंत आलो, याबद्दल त्याला (परमेश्वर) ला धन्यवाद द्यावे, अशी इच्छा जिन्याला नाही.. आणि दुसरा म्हणजे, "आपल्याला वरपर्यंत आणून सोडणा-या या जिन्याला धन्यवाद द्यावे/त्याचे कर्ज फेडावे" असे माणसाला वाटण्याची अपेक्षा जिन्याला (माणसाकडून) नाही. यापैकी कुठला अर्थ घ्यावा?
एक विनंती- हा नामधारी 'गप्प' पणा सोडा, आणि चांगल्या गझलेला तसेच समर्पक शीर्षक द्या.
ज्ञानेश.
शुक्र, 24/10/2008 - 15:57
Permalink
अजून एक-
माझाही एक शेर-
"ऋतू संपून गेले की, निबरली कातडी आता-
तशी थंडी कुठे आहे? तशी लाही कुठे आहे..?"
भूषण कटककर
शनि, 25/10/2008 - 14:26
Permalink
खरे आहे.
इथ लक्षात आले माणसालाही कुठे आहे? खरे आहे आपले म्हणणे तिलकधारी.
चांदणी लाड.
सोम, 27/10/2008 - 09:19
Permalink
काट्याविना परिचय फुलालाही ....
तिलकधारी काका....
हा शेर... तुम्हा प्रतिसाद माझे बोचल्याने गप्प झालो मी
तसा काट्याविना परिचय फुलालाही कुठे आहे?
म्हणजे सर्व फुलांना काटे असतात की काय??.
जरूरी आमची इतकी जगालाही कुठे आहे?
जगाची गरज तितकीशी अम्हालाही कुठे आहे?...हा शेर आवडला...
!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!