आरसा

पाण्यातल्या रंगासम असा,
लागे कशाला मग आरसा ?


या जीवनाची ही पद्धती..
कासव पळे अन् झोपे ससा


सांभाळले मी दु:खा असे...
उचलून घेतो बालक जसा


अर्जून राही मागे उभा..
चाले शिखंडीचा वारसा


कंसात कोणी आले जसे...
बनलोच मीही कान्हा तसा


करतो अताशा मीही चुका
नित जिंकतो दुर्गम साहसा


फुकटात दु:खे मिळती जगां..
कापून गेले सा-या नसा

गझल: 

प्रतिसाद

व्वाह अजय, वा
या जीवनाची ही पद्धती..
कासव पळे अन् झोपे ससा

सांभाळले मी दु:खा असे...
उचलून घेतो बालक जसा

अर्जून राही मागे उभा..
चाले शिखंडीचा वारसा
तीन अप्रतिम शेर!

अजय,
बालक शेर म्हणजे गझलियत म्हणजे काय या शंकेचे अत्यंत कमी शब्दात स्पष्टीकरण आहे.
उत्तम गझल आहे.
हे वृत्त निवडणे गझलकारासाठी उचित नाही असे मला वाटते. अलामत.....असो. मी गप्प आहे.

सांभाळले मी दु:खा असे...
उचलून घेतो बालक जसा

अर्जून राही मागे उभा..
चाले शिखंडीचा वारसाफुकटात दु:खे मिळती जगां..
कापून गेले सा-या नसा

धन्यवाद.
तिलकधारी,
हे वृत्त निवडणे गझलकारासाठी उचित नाही असे मला वाटते.
उदाहरणासहित स्पष्ट करा.
कलोअ
चूभूद्याघ्या