औषधाने मी बरा होत नाही.
औषधाने मी बरा होत नाही
शब्द वैद्याचा खरा होत नाही
नित्य जळते काळीज विस्तवाचे,
-की कुणीही सोयरा होत नाही!
किती रिचवू मी विष जीवनाचे?
अता धावा! शंकरा!..होत नाही!
असे नाही की, कैकयीच दु:खी,
सुखी ती ही मंथरा होत नाही
स्वप्न त्यांना स्पर्धेत बक्षिसाचे,
पूर्ण ज्यांचा अंतरा होत नाही
कधी स्मरले तुज मागल्या घडीला?
स्मरण त्याचे, ईश्वरा, होत नाही
एकदा का हे मर्म-बंध तुटले;
पुन्हा त्याचा मोगरा होत नाही
-मानस६
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 07/10/2008 - 23:40
Permalink
चांगली कल्पना
नित्य जळते काळीज विस्तवाचे,
-की कुणीही सोयरा होत नाही!
तिलकधारीकाका
बुध, 08/10/2008 - 09:52
Permalink
असे करू नये.
मानस?
असे करू नये. सहाव्वा शेर किती छान केलास? अगदी गझलेसारखा शेर आहे की नाही? इतका छान शेर करू नये. मनात विचांरांना चालना मिळते की नाही? की अरे आपले काय चाललेले आहे? आपल्याला देवाची आठवण तरी आहे का? ज्याला शेवटी तोंड दाखवायचे आहे त्याचे कार्य आपण करतोय का? की फक्त आपल्यातच गुंगलो आहोत? वाह!
तुझे बाकीचे शेर कसे आहेत हे बोलण्याची गरज नष्ट होते या एका शेरामुळे.
संतोष कुलकर्णी
बुध, 08/10/2008 - 17:54
Permalink
कल्पना
कल्पना चांगल्याच आहेत. मात्र लय सांभाळणे भाग आहे.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
अजय अनंत जोशी
बुध, 08/10/2008 - 22:35
Permalink
छान विचार..
नित्य जळते काळीज विस्तवाचे,
-की कुणीही सोयरा होत नाही!
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
शुक्र, 10/10/2008 - 13:30
Permalink
मानस
मानस,
मला गझल आवडली. स्पर्धेचा शेर एकदम खल्लास आहे. तसेच ईश्वराचा शेर फार सुंदर.
तिलकधारींकडे कितपत लक्ष द्यायचे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
ॐकार
गुरु, 16/10/2008 - 22:08
Permalink
औषधाने मी बरा होत नाही
औषधाने मी बरा होत नाही
शब्द वैद्याचा खरा होत नाही
एकदा का हे मर्म-बंध तुटले;
पुन्हा त्याचा मोगरा होत नाही
बाकी शेर काही खास वाटले नाहीत.