सोळा...
घेतला तर छान धांडोळा
...अन्यथा सगळाच पाचोळा
सारखे उडते हवेने जे -
तू किती करशील ते गोळा ?
मी खरे तर बेरकी आहे
चेह-याने वाटतो भोळा
काम य़ेथे चांगले झाले
-फिरव आता त्यावरी बोळा
काळजी घे, जप स्वतःला तू
पूर्ण झाले वय तुला सोळा
... सर्व गझलकारांना दस-याच्या शुभेच्छा !
गझल:
प्रतिसाद
तिलकधारीकाका
सोम, 06/10/2008 - 15:56
Permalink
असे करू नये.
केदार?
असे करू नये. तुझ्या दसर्याच्या शुभेच्छांच्या उजव्या बाजुला 'गझल' असे लिहिलेय की नाही? मग गझल का बरे नाही केलीस? गझल या सदरात गझल न करता काही रदीफ, काफिया व वृत्त यांच्या बंदिस्त रचना करणे म्हणजे शोकेसमधे लाकडाची फळे ठेवतात तसे वातते की नाही? जी खायला मुले धावतात अन निराश होतात.
असे नाही करू. तुलाही दसर्याच्या शुभेच्छा!
मी आपले साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 07/10/2008 - 23:39
Permalink
चांगला शेर आहे, सुविचाराप्रमाणे, शेवटचा शेर नस्ता तरी चालले असते
घेतला तर छान धांडोळा
...अन्यथा सगळाच पाचोळा
संतोष कुलकर्णी
बुध, 08/10/2008 - 12:39
Permalink
हरकत नाही....
थोडा वेगळा बाज आहे. गैरमुरद्दफ गझल लिहिताना तिचे गैरमुरद्दफ असणे स्वाभाविक वाटावे. काही शेरांत ते तसे वाटते. एखादा शेर भरतीनेही येतो, मात्र तोही अर्थवाही असेल तर हरकत नाही असे माझे मत आहे. शुभेच्छा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
तिलकधारीकाका
बुध, 08/10/2008 - 14:43
Permalink
किती छान!
प्रा. डॉ. संतोष,
किती छान प्रतिसाद दिलात! शेरांत अर्थ नाही हे इतक्या छान पद्धीतीने सांगणे मला नसते बाबा जमले.
प्रदीप कुलकर्णी
बुध, 08/10/2008 - 19:44
Permalink
वा...
सारखे उडते हवेने जे -
तू किती करशील ते गोळा ?
शुभेच्छा.