ये तुला मी भेटतो...

दु:ख कंटाळे, म्हणे, रोज का मी भेटतो?
तेच येते सारखे, बावळा मी, भेटतो!


येत जा तुम्ही इथे, त्यात माझा फायदा
भेटलो तुम्हास मी, की मला मी भेटतो


फूलविक्रेता म्हणे, फार मंदी चालली
की तिला हल्ली कुठे, फारसा मी भेटतो?


कोण आनंदी कुठे, नी समाधानी कुठे
शोधुनी कोणी असा, प्यायला मी भेटतो


आठवण विरहातली, छेडणे, धोकाच तो
जा झरा शोधायला, तर सुनामी भेटतो


लाख गझला व्हायच्या, माणशी, केल्याच तर
जो असामी भेटतो, तोच नामी भेटतो


उंदरांचे फावले, मांजरींचा राग हा
नेमका वाटेमधे, आडवा मी भेटतो


वाढले हे वय जरी, एकदा दिवसातुनी
होउनी आईपुढे, तान्हुला मी भेटतो


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 



 

गझल: 

प्रतिसाद

ते जिथे जाते तिथे, बावळा मी, भेटतो.
असे वाचून पाहावे.
 

येत जा तुम्ही इथे, त्यात माझा फायदा
भेटलो तुम्हास मी, की मला मी भेटतो