नांवही आता नुरे

जन्म घेणे, संपणे, यामधे जे चालते
त्या उठाठेवी किती, केवढाले हाल ते


नांवही आता नुरे, शायरी संग्राम हा
हो दिवाभीतापरी, शूर होते काल ते


खड्ग म्यानातून जे, काढती ते वारले
शेवटी जगले बघा, वापरी जे ढाल ते


ओढणी घेऊन जा,भोवताली लोक हे
पाहुनी अश्शी तुला, व्हायचे कंगाल ते


राहिलो तस्साच मी, व्यासपीठी एकटा
घेउनी गेले बघा,श्रीफले हे, शाल ते


बोलुदे ना बोलुदे, पाहुनी रस्त्यामधे
एवढे आहे पुरे, लाल झाले गाल ते


ओघळे नी धावती, लोक त्याला चुंबण्या
मोकळ्या केसामधे, फूल ती जे घालते






 


 


 



 

गझल: 

प्रतिसाद

जन्म घेणे, संपणे, यामधे जे चालते
त्या उठाठेवी किती, केवढाले हाल ते



खड्ग म्यानातून जे, काढती ते वारले
शेवटी जगले बघा, वापरी जे ढाल ते