नूर...

आर्त माझी हाक नामंजूर आहे
ती सदासाठीच जाते दूर आहे


वाजवावी शीळ बाकीच्या कुणीही
आमचा हरवून गेला सूर आहे


ठीक बाकी भासती माझ्या घराच्या
एक खिडकी मात्र ही भेसूर आहे


रोज येता जात असता वाटते की
आपली वस्ती किती बेसूर आहे


मी निरोपाला तिच्या जाणार नाही
ती असो, मी तेवढा ना शूर आहे


झलक फर्माईश आता बंद व्हावी
हा तिचा सल्ला मला मंजूर आहे


चालवा गाडी हळू ताटातुटीची
ऐकले अश्रूंस आला पूर आहे


का सुगंधाची हवेला याद यावी
वाटते तीही तशी आतूर आहे


का रडावे, साजरा होऊन जावो
जीवनाचा एक हाही नूर आहे


 


 


 


 


 


 





 

गझल: 

प्रतिसाद

चालवा गाडी हळू ताटातुटीची

समीरशी सहमत.