श्रीमंत प्रेयसी
न कारंजी उडू देऊ मनाची यार बेण्याची
सफाई द्यायला आली असावी ती 'न येण्याची'
तुझी कंगाल छोटी झोपडी लखलाभ हो तुजला
तिची नाजूक स्वारी वाट पाही पुष्पमेण्याची
तुला ताटातुटीचा भार वाटावा न यासाठी
घरी स्थापून घे मूर्ती अजिंठ्यातील लेण्याची
इथे आवाज झाला बंद, वाटे का तिला चिंता?
म्हणे "आता जरूरी ना मला आवाज देण्याची"
कट्यारी बंदुका आहेत माझ्या माहितीमध्ये
निघाली ही नवीशी रीत आता जीव घेण्याची
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
बुध, 17/09/2008 - 14:06
Permalink
मस्तच!
"तुझी कंगाल छोटी झोपडी लखलाभ हो तुजला
तिची नाजूक स्वारी वाट पाही पुष्पमेण्याची"
"कट्यारी बंदुका आहेत माझ्या माहितीमध्ये
निघाली ही नवीशी रीत आता जीव घेण्याची"
हे फार आवडले.