सोसेना
Posted by योगेश वैद्य on Monday, 15 September 2008
पापण्यांचे पापण्यांना सोसेना
एवढेसे स्वप्न त्यांना सोसेना
हे फुलाचे पाप झाले झुरण्याचे
भास आता पाकळ्यांना सोसेना
वास रक्ताचा कळेना कोणाच्या!
त्रास माझ्या गारद्यांना सोसेना
पार व्हावे एकदाचे गाभारे
शांत जगणे एकट्यांना सोसेना
वासनांना द्याच माफी पितरांनो!
पिंड शिवणे कावळ्यांना सोसेना
गझल: