जगा बेभान यारो

कुणी या मांजरीला नेत माझी वेस सोडावे
पुन्हा येणार नाही त्यातिथे गझलेस सोडावे


दुधामध्ये मिळावी शर्करा हा योगही यावा
फुलेही सापडावी अन तिनेही केस सोडावे


जरी ती येत नाही रात ही जागून काढावी
रिकाम्या फाटक्या चंद्रासही पुर्वेस सोडावे


प्रतिज्ञाही करावीरे सकाळी मद्यमुक्तीची
न पाळावी उगा जादा तिला संध्येस सोडावे


जगा बेभान यारो काय आहे जिंदगीमध्ये
इथे ना पोहणे येवो तरी नावेस सोडावे

गझल: 

प्रतिसाद

दुधामध्ये मिळावी शर्करा हा योगही यावा
फुलेही सापडावी अन तिनेही केस सोडावे

सुंदर!

पुन्हा येणार नाही त्यातिथे गझलेस सोडावे
हे  तर   अफाटच!