दिशा पहाटल्यात
चला पुन्हा मनास दु:ख पांघरायला चला
दिशा पहाटल्यात सत्य अंथरायला चला
न मागतो तरी मिळे, न वाचवी तरी उरे
उगाच लाभलाय वेळ वापरायला चला
न आज घेतली, न घेउनीच चाललोय मी
जरा मला धरायला नि सावरायला चला
'अधीकचिन्ह' दोन आकड्यामधील मी असे
वजा करा मला नी बेरजा करायला चला
यमास भेटण्या सरावही करून ठेवुया
चला जगात या पदोपदी मरायला चला
न येतसे कुणी न लागणार चाहुली कधी
उगाच आपआपलेच खाकरायला चला
न झेपणार किंमती हुशार व्हायच्या इथे
तसेच बावळून लाज सावरायला चला
न खोड जायची मना तुझी कधी जुनीच ही
जरूर ना जिथे तिथेच वावरायला चला
गझल:
प्रतिसाद
बाण
सोम, 15/09/2008 - 15:54
Permalink
पहिला शेर
पहिला शेर बाण! नवीन भात्यातला बाण!
अजय अनंत जोशी
सोम, 15/09/2008 - 23:52
Permalink
नक्कीच
दिशा पहाटल्यात ..
समीर चव्हाण (not verified)
गुरु, 18/09/2008 - 11:07
Permalink
क्या बात है
न मागतो तरी मिळे, न वाचवी तरी उरे
उगाच लाभलाय वेळ वापरायला चला,
न मागतो तरी मिळे, न वाचवी तरी उरे
बर्याच शक्यता घेऊन आली आहे ही ओळ...
भूषण कटककर
गुरु, 18/09/2008 - 17:50
Permalink
धन्यवाद!
धन्यवाद श्री बाण, श्री अजय व श्री समीर! पाठीवर थाप मिळाली की आनंद होतोच.