गुंते
वळतो मी,सोडवतो जुने गुंते
थकतो मी,रोज उभे नवे गुंते
जगण्याची हाव पुन्हा पुन्हा होई
सुटणारे फार तसे कुठे गुंते?
पुसण्याला आज मला छुपे आले
टळले माझे कळल्यामुळे गुंते
पडणारे स्वप्न तरी पुरे व्हावे
पण तेही आटपले,तिथे गुंते
वय झाले फार असे कुठे माझे?
इतके का सावध आपले गुंते?
मिळते ना रोज नवे शिकारीला?
ढकलावे रोज पुढे पुढे गुंते
गझल:
प्रतिसाद
रसिक (not verified)
सोम, 15/09/2008 - 08:54
Permalink
प्रतिसाद
गझलेहून यादगारचा प्रतिसाद आवडला.
योगेश वैद्य
रवि, 01/02/2009 - 00:14
Permalink
हा
प्रतिसाद कशाला ठेवलाय अजून?
यादगारचा प्रतिसाद दिसत नाही.