मैत्री
कशी झाली ? कधी झाली ? तुझी माझी गडे मैत्री
मना कोडे सदा घाली, तुझी माझी गडे मैत्री
टपोरे चांदणे गेले, उटी लावून अंगाला
पहाटेला कशी न्हाली, तुझी माझी गडे मैत्री
कशासाठी लिहू मीही, चिठोरा चार शब्दांचा
खुणा गोंदी तुझ्या गाली, तुझी माझी गडे मैत्री
जरी भेटावया आलो, तुला मी चोरवाटेने
तरी सर्वा दिसू आली, तुझी माझी गडे मैत्री
फुकाची चंद्रतार्यांची, उदाहरणे नको आता
बरी आहे नभाखाली, तुझी माझी गडे मैत्री
-प्रसाद कुलकर्णी
पूर्व प्रकाशन - सकाळ कोल्हापूर ०६/०१/२००२
गझलांकित २००४
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
रवि, 14/09/2008 - 14:55
Permalink
'गडे माझी तुझी मैत्री' असे केले तर ?
प्रसाद,
खूप छान. सखीच्या आठवणीने मन मोहरून टाकणारी गझल.
शेवटून दुसरा शेर अप्रतिम.
..तरी सर्वां दिसू आली, तुझी माझी गडे मैत्री
एक सूचना-
गडे माझी तुझी मैत्री असे जास्त लयबध्द वाटत आहे.
तसे करून व वाचून पाहावे.
भूषण कटककर
रवि, 14/09/2008 - 17:52
Permalink
गुड वन!
चांगली गझल आहे.
चित्तरंजन भट
मंगळ, 16/09/2008 - 00:00
Permalink
तरी सर्वां दिसू आली, तुझी माझी गडे मैत्री
खूप छान. सखीच्या आठवणीने मन मोहरून टाकणारी गझल.
शेवटून दुसरा शेर अप्रतिम.
..तरी सर्वां दिसू आली, तुझी माझी गडे मैत्री
एक सूचना-
गडे माझी तुझी मैत्री असे जास्त लयबध्द वाटत आहे.
तसे करून व वाचून पाहावे.
केदार पाटणकर ह्यांच्याशी सहमत आहे. गझल फार आवडली. स्वागत आहे.
पपि (not verified)
मंगळ, 30/12/2008 - 17:48
Permalink
कशी झाली ?
कशी झाली ? कधी झाली ? तुझी माझी गडे मैत्री
मना कोडे सदा घाली, तुझी माझी गडे मैत्री
टपोरे चांदणे गेले, उटी लावून अंगाला
पहाटेला कशी न्हाली, तुझी माझी गडे मैत्री
कशासाठी लिहू मीही, चिठोरा चार शब्दांचा
खुणा गोंदी तुझ्या गाली, तुझी माझी गडे मैत्री
जरी भेटावया आलो, तुला मी चोरवाटेने
तरी सर्वा दिसू आली, तुझी माझी गडे मैत्री
फुकाची चंद्रतार्यांची, उदाहरणे नको आता
बरी आहे नभाखाली, तुझी माझी गडे मैत्री
रविकुमार बोडखे (not verified)
मंगळ, 13/01/2009 - 10:54
Permalink
अप्रतिम ....
कशासाठी लिहू मीही, चिठोरा चार शब्दांचा
खुणा गोंदी तुझ्या गाली, तुझी माझी गडे मैत्री
अप्रतिम.. ! एवढेचं पूरे अाहे.
प्रसाद लिमये
मंगळ, 13/01/2009 - 21:49
Permalink
कशासाठी
कशासाठी लिहू मीही, चिठोरा चार शब्दांचा
खुणा गोंदी तुझ्या गाली, तुझी माझी गडे मैत्री
............. मस्तच
सुनेत्रा सुभाष
गुरु, 15/01/2009 - 16:36
Permalink
सुरेख गझल