निरर्थक...
एकांत सोसवे ना... प्रेमात अर्थ कसला?
प्रेमास घाबरे त्या.. हृदयांत अर्थ कसला?
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय..
ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला?
रण थोडके नसे परि पेटे पराक्रमाने,
जो आपुला न झाला.. विजयांत अर्थ कसला?
बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी..
बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला?
वाहून काळजातुन तृष्णा अनेक मिटल्या..
पण..बांध घातले तर.. झरण्यात अर्थ कसला?
मांडू नका समोरी पेले असे रिकामे..
भरणे नसे इथे तर... जमण्यात अर्थ कसला?
क्रांती मशाल घेवुन मेले स्वतः परंतू...
कोणीच आठवे ना... मरण्यात अर्थ कसला?
मेलेच पाहिजे मी वाटू नये परंतू..
मरतो हरेक क्षण तर.. जगण्यात अर्थ कसला?
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शनि, 13/09/2008 - 11:46
Permalink
वेगळी
श्री अजय,
ही आपली गझल वेगळी आहे. अनेक मूड्स एकत्र आलेत. थोडीशी स्तोत्रांसारखी मांडणी आहे.
गुड! मोठ्यांदा वाचली की मजा येते.
कैलास
बुध, 24/02/2010 - 20:55
Permalink
क्या बात है !!! खरेच ..मजा
क्या बात है !!! खरेच ..मजा आली.
डॉ.कैलास
प्रताप
गुरु, 25/02/2010 - 16:29
Permalink
खुप आवडली. सोशीत माय आवडले.
खुप आवडली. सोशीत माय आवडले.
ऋत्विक फाटक
शुक्र, 26/02/2010 - 20:29
Permalink
वा: गझल आवडली! शेवटचा शेर तर
वा: गझल आवडली!
शेवटचा शेर तर अप्रतिमच!
डॉ. कैलास.. आपण बेफिकीरसाहेब आणि अजयसाहेबांच्या जुन्या उत्तमोत्तम गझला परत पुढे आणल्यात याबद्दल आपले आभार!
सोनाली जोशी
शुक्र, 26/02/2010 - 20:39
Permalink
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय..
ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला?
वा!
सोनाली
कैलास
शुक्र, 26/02/2010 - 21:44
Permalink
डॉ. कैलास.. आपण बेफिकीरसाहेब
डॉ. कैलास.. आपण बेफिकीरसाहेब आणि अजयसाहेबांच्या जुन्या उत्तमोत्तम गझला परत पुढे आणल्यात याबद्दल आपले आभार
खरे तर मी आपणा सर्वांचा आभरी आहे की,आज्काल मी गझलाधारित पुस्तके वाचण्याची गरजच भासत नाही इतक्या सम्रुद्ध गझला आपण सर्वांनी लिहिल्या आहेत.....
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
शनि, 27/02/2010 - 05:29
Permalink
क्या बात है !!. आवडली.
क्या बात है !!.
आवडली.
अजय अनंत जोशी
सोम, 01/03/2010 - 23:40
Permalink
सर्वांना धन्यवाद! (म्हणजे ही
सर्वांना धन्यवाद!
(म्हणजे ही अगदीच 'निरर्थक' नाही आहे तर..! ....:))