नवा नकार

लाव दार मी कथा उठावदार सांगतो
दु:ख पेरुनी पिके कशी बहार सांगतो


'गोड बोलुनी जिभेस धार ये' न जाणले
आपल्यांकडून घेतलेत वार सांगतो


ती न मानुदे तरी तुम्हास यार सांगतो
लागला असेल तीर आरपार सांगतो


सासरास चालता, वळून फार पाहिले
जीवनात हा कळू नये  थरार सांगतो


जो बघे तिला बनेल चित्रकार सांगतो
स्पर्श जो करे बनेल शिल्पकार सांगतो


गाजलो बघा किती अपार शायरीत मी
का? विचारता म्हणे सुमार फार सांगतो


धूर घ्या नि शूर व्हाच बारबार सांगतो
फुफ्फुसांस माझिया "करा करार" सांगतो


पाहुनी यमास जो 'उगाच दार वाजवी'
शब्द शोधतो नवे, नवा नकार सांगतो


 




 


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

गाजलो बघा किती अपार शायरीत मी
का? विचारता म्हणे सुमार फार सांगतो
धूर घ्या नि शूर व्हाच बारबार सांगतो
फुफ्फुसांस माझिया "करा करार" सांगतो
आणखी एक..
काळजांस माझिया सदाच गंध भावतो...
काल राहिले तुझ्याकडे उधार सांगतो