मलीन !
............................
मलीन !
............................
प्रश्न आले पुन्हा नवीन किती !
उत्तरे कालचीच दीन किती !
ग्रासले जन्म, जन्म दुःखांनी....
द्यायचे घास आणखीन किती ?
जो म्हणाला चिडून नीच तुला....
तो निघाला स्वतःच हीन किती !
हात फैलाव तू तुझे दोन्ही...
शेवटी पाहिजे जमीन किती ?
या घरांची विशेषणे लाखो ...
देखणी, मस्त, छानबीन किती !
बंगले बंगल्यांवरी बांधा...
लागती एक...दोन...तीन ? किती ? ?
शांत पाहून सोसणे माझे...
दुःख झाले मवाळ, लीन किती !
का विचारू तुलाच मी हेही...?
मी असावे तुझ्या अधीन किती ?
भेटलो आज खूप वर्षांनी....
बोललो आणि अर्थहीन किती !!
जो नको तो विचार मी केला...
वाटले मग मला मलीन किती !
- प्रदीप कुलकर्णी
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
बुध, 10/09/2008 - 23:57
Permalink
आणखी दोन काफिये
प्रदीप,
एक रेखीव, सुबक रचना.
आणखी दोन काफिये देतो. कुलीन व अंतहीन. आणखी दोन शेर होऊन जाऊ देत.
त्या दोन्ही शेरांना शुभेच्छा.
आजानुकर्ण
गुरु, 11/09/2008 - 01:11
Permalink
क्या बात है!!
भेटलो आज खूप वर्षांनी....
बोललो आणि अर्थहीन किती !!
खूप सुंदर आणि अर्थपूर्ण ओळी. गझल आवडली हे वे सां न ल .
पुलस्ति
गुरु, 11/09/2008 - 01:17
Permalink
वा वा !!
सुरेख गझल आहे!!
जमीन, अर्थहीन आणि मलीन हे शेर खास! एक-दोन-तीन शेर तर सणसणीत आहे!!
बाण
गुरु, 11/09/2008 - 09:57
Permalink
अंह!
नववा शेर निशाणावर लागणारा बाण आहे. बाकी बाण तुमच्या इतर भात्यांमधील बाणांइतके धारदार भासत नाहीत. अश्वत्थाम्याकडेच नारायणास्त्रही होते आणि साधी अस्त्रंही!
केदार पाटणकर
गुरु, 11/09/2008 - 10:40
Permalink
अर्थहीन......आवडला शेर
प्रदीपजी,
सर्वात जास्त खालील शेर आवडला.
भेटलो आज खूप वर्षांनी....
बोललो आणि अर्थहीन किती !!
समीर चव्हाण (not verified)
गुरु, 11/09/2008 - 10:54
Permalink
व्वा
जो नको तो विचार मी केला...
वाटले मग मला मलीन किती !
अजय अनंत जोशी
गुरु, 11/09/2008 - 19:22
Permalink
हं...
छान.
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 11/09/2008 - 19:55
Permalink
सगळ्यांचे आभार...!
प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार...!
अनिरुद्ध अभ्यंकर
शुक्र, 12/09/2008 - 01:09
Permalink
वा!!
प्रदिप,
पुन्हा एक अप्रतिम गझल..
जो म्हणाला चिडून नीच तुला....
तो निघाला स्वतःच हीन किती !
का विचारू तुलाच मी हेही...?
मी असावे तुझ्या अधीन किती ?
भेटलो आज खूप वर्षांनी....
बोललो आणि अर्थहीन किती !!
जो नको तो विचार मी केला...
वाटले मग मला मलीन किती
हे शेर विशेष आवाडले..
अनिरुद्ध
सोनाली जोशी
शनि, 13/09/2008 - 02:17
Permalink
वा
भेटलो आज खूप वर्षांनी....
बोललो आणि अर्थहीन किती !!
जो नको तो विचार मी केला...
वाटले मग मला मलीन किती !
वा! हे दोन शेर फार सुरेख!