आहे हयात अजुनी

फुंकू नकोस शंखा खोट्या जयात अजुनी
निरखून बघ जरा मी आहे हयात अजुनी


जगतो जगा मी दुष्टा तू ठेवशी तसा पण
मरणाधिकार असती माझ्या कह्यात अजुनी


मज भेटण्यास देवा का वेळ मागशी तू
केव्हाही ये असे मी मद्यालयात अजुनी


का वानवा पडावी दुनियेत प्रेमिकांची
का मी कटाक्ष झेलू याही वयात अजुनी


गर्भात अंकुराला मिळतो प्रवेश जैसा
हलकेच अर्थ येवो या आशयात अजुनी

गझल: