रंग होतो सावळा
चंद्र आला तारकांचा घेउनी गोतावळा
सूर्य बावरला म्हणाला मावळा रे मावळा
लाजते केवळ, मी वेडा प्रेम आहे सांगतो
कोहळा काढून घेते देई साधा आवळा
या जगी मी काय रे पाहू नि कोणा पाहू मी
ती नजर हटवू कुठे देते मी ठरतो बावळा
आपल्यांच्या साथीने परक्यासही सांभाळतो
कोण आहे चांगलेरे कोकीळा का कावळा
फार प्रगतीच्याच मागे धावता, कुणी पोरगा
सांगतो बापास, "मामा, काढ आमच्या जावळा"
आग येथे लागलेली बंब भलत्या बाजूला
ओढणी नऊवार आहे का गळ्याला आवळा
तोंड गोरे आमचेही राहूदे प्रतिसाद द्या
टाळी नाही वाजली की रंग होतो सावळा
गझल: