वाकडे

स्थापता तुम्हीच मूर्ती घालता तरी साकडे
माणसे आहात की बिन शेपटीची माकडे


ती विचारे का धडकशी रे मला मी बोललो
चाललो नाकापुढे पण नाक माझे वाकडे


की जरी व्यवसाय असला एक दोघांचा तरी
मन धुवावे कविकडे अन कापडे परटाकडे


यार हो बघताय ना झाली कशी माझी तर्‍हा
अर्थ ना गझलेत केवळ मोजतो मी आकडे


काय इतका राग दैवा तू धरी माझ्यावरी
नेमकी माझ्याच वेळी का भिजावी लाकडे

गझल: 

प्रतिसाद

काय इतका राग दैवा तू धरी माझ्यावरी
नेमकी माझ्याच वेळी का भिजावी लाकडे 
की जरी व्यवसाय असला एक दोघांचा तरी
मन धुवावे कविकडे अन कापडे परटाकडे
यार हो बघताय ना झाली कशी माझी तर्‍हा
अर्थ ना गझलेत केवळ मोजतो मी आकडे    (आत्मसाक्षात्कार झालेला दिसतोय)
शेरात अर्थ सुध्दा येतो आहे आता. चालू द्या...
ती विचारे का धडकशी रे मला मी बोललो
चाललो नाकापुढे पण नाक माझे वाकडे ( हा सुध्दा चांगला खयाल आहे पण वाक्य रचना  अजून तरल हवी , खास करून पहिल्या ओळीत )

धन्यवाद टी जी बी एस एस के नॉट व्हेरिफाईड. मी आपल्या सूचनांवर निश्चीत विचार करेन.