काळज्या

उरी काळज्या जेवढ्या माजल्या
कवी जाहलो आणि नावाजल्या


जरा लाभला तोष बघताच त्या
कशा मत्सरी काळज्या खाजल्या


मला भांडणे पाहण्याची मजा
जुन्या काळज्यांना नव्या पाजल्या


बने एकका काळजीची गझल
जगाला दिल्या केवढ्या गाजल्या

कधी बोलविता मी कुरवाळण्या
जुन्या धावल्या नवशिक्या लाजल्या


नका हाकलू  फार नाराजल्या
मनाआतुनी काळज्या वाजल्या


चिताही म्हणे हा जळावा कसा
धगी काळज्यांच्या मला भाजल्या


 


 

गझल: 

प्रतिसाद

'एकका' चा अभिप्रेत अर्थ एकेका  काळाजीची  किंवा प्रत्येक काळाजीची  असा असल्यास  योग्य शब्द योजावा किंवा वाक्य बदलावे. ंमाणसा = माणसाला  त्याच प्रमाणे एकका हे  एकक (unit)  चे  एककाला असे रूप प्रतीत होत आहे.
बने एकका काळजीची गझल   ( बने काळ्जी-काळ्जीची गझल ं )
जगाला दिल्या केवढ्या गाजल्या

चिताही म्हणे हा जळावा कसा
धगी काळज्यांच्या मला भाजल्या
(इथे मला  किंवा कुणालातरी भाजला से अभिप्रेत आहे काय ?  असल्यास वाक्य रचना बदला. वाक्य रचना काय सांगत आहे?  नक्की कोण भाजल्या ? )
- संपादक

माझ्या काळज्यांच्या धगी चितेला भाजल्या.
सूचनांवर विचार करेन.धन्यवाद.