ताठ
हा जो नदीकाठ आहे
तुटली इथे गाठ आहे
मी थांबणे तू न येणे
नियमीत परिपाठ आहे
समजूत तू घातलेली
पुरती मला पाठ आहे
तुझ्या यौवनाएवढा मी
नसलो तरी ताठ आहे
असे कोवळी सांज आणि
हृदयी व्यथा राठ आहे
गझल:
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी...
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
हा जो नदीकाठ आहे
तुटली इथे गाठ आहे
मी थांबणे तू न येणे
नियमीत परिपाठ आहे
समजूत तू घातलेली
पुरती मला पाठ आहे
तुझ्या यौवनाएवढा मी
नसलो तरी ताठ आहे
असे कोवळी सांज आणि
हृदयी व्यथा राठ आहे