शायरी का न यावी

 मती गुंग व्हावी निशा जागवावी
तुला पाहुनी शायरी का न यावी


संजीवनी ही विनामूल्य आहे
वेणी मृताला तुझी हुंगवावी


नहाशील तू हाच अंदाज आहे
उगा का नदीला अशी धार यावी


बहारीत जी वेल येण्यास टाळे
तिलाही तुझी पाउले चुंबवावी


जिथे शर्करेचा तुटवडा दिसावा
तुझी पालखी लाडके चालवावी


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

संजीवनी ही विनामूल्य आहे
वेणी मृताला तुझी हुंगवावी

जिथे शर्करेचा तुटवडा दिसावा
तुझी पालखी लाडके चालवावी

अप्रतिम. छान जमलंय.

इथे ध्यास तुमचा तिलाही दिसावा ..
कशी कोणती निर्गाठ सोडवावी