रेशमी

चाललो ते मैल जादा की पुढे उरलेत ते
घ्यायला अंदाज डोळे काय आतुरलेत ते


का मला नरकातही जागा नसावी ना कळे
देव सांगे की तुझ्यावर सर्व कुरकुरलेत ते


केस डोळे रेशमी काया तुझी झळकावुनी
ऐक आम्हाला तयावर शब्द जे स्फुरलेत ते


नेमका तसलाच आला गंध या वार्‍यावरी
की निघाले बोचरे काटे तिचे पुरलेत ते


सारखा का हात वरती नेतसे कोणी कवी
टोप डोक्यावर, दवंडी केस भुरभुरलेत ते


लोकहो  समजून  घ्या की लोणचे नसणार हे
गरज नाही तेच सारे चांगले मुरलेत ते


 


 

गझल: