शौकीन का आहे

अपयश माझे इतके शौकीन का आहे
प्रत्येक यशाचे ते जामीन का आहे


टाळ प्रिये मजला डिवचू नकोस बघुनी
खोटे हसण्याइतका मी हीन का आहे


चारित्र्य पाहुनी ती लाथाडते प्रेमाला
तिला विचारा की ते मलीन का आहे


कवितेचे गणिताचे प्रेम पाहुनी कळ्ले
प्रत्येक गझल माझी विचाराधीन का आहे


मदिरा मी घेतलेली भलतीच गोड होती
डोळ्यात काहीसे मग नमकीन का आहे


जो भेटतो मला तो राजा बनून येतो
कळले असेल तुजला मी दीन का आहे


सूर्य गस्त घाली पाहून चंद्र बिचके
पृथ्वी मला समजले शालीन का आहे


भूषण कटककर


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

कवितेचे गणिताचे प्रेम पाहुनी कळ्ले
प्रत्येक गझल माझी विचाराधीन का आहे
हा शेराचा एक चांगला खयाल झाला बरे ...  मात्रा  काही मी मोजत नाही, मला मात्रा  मोजायचा कंटाळा येतो त्यामुळे इथे वृत्ताचे काय झाले आहे ते ठाऊक नाही. तसेही  आपले यादगार  नेहमी म्हणतात की मात्रा मोजून मोजून लिहू नये. प्रत्येक वृत्ताचा स्वतःचा असा एक ठेका असतो तो ठेका मिसरा वाचताना किंवा लिहिताना लगेच जाणवतो आणि जाणवलाच पहिजे. जर वृत चुकले तर तो ठेका ती लय ़जणवत नाही.... इत्यादी वगैरे.

धन्यवाद 64. गणितात मी पारंपारिकरीत्या कच्चा आहे. हा हा हा.

मात्रा शहीद झाल्या पण.... हळू हळू येणार सगळे काही ... यादगार म्हणतात तेही कच्चे लिंबू होते या इथे त्यांचाच एक प्रतिसाद आहे तो वाचा बघू आधी.
http://www.sureshbhat.in/node/817

वृत्त आणि व्याकरणाचे संकेत न पाळणार्‍या रचनांना सावकाश विचाराधीन करण्यात येईल.