आयुष्याचे रोप

गुणसुत्रे  नि पेशींसंगे प्राणी बदलून गेले
गाव संपले माझे  आणिक शहर वसवून गेले

किलबिलणाऱ्या पक्ष्या देतो, मुठीमुठीने दाणे
त्याच्या ओठावरती  गाणे होते रुसून गेले

कसा आगळा सुगंध आता जुईस येतो आहे
प्रेमाने या मातीला हे कोण कवळून गेले?


किरणांसम चमकत ही ध्येये माझ्यासमोर आली
गेली ती निसटून दूर अन् मीही हरवून गेले

नकोस पाहूस चित्रामधला पाऊस तू हळवा
सरीसरीचे  भिजलेले  मन कोण समजून गेले?

आशेचे बीज घेउनी मी फिरते आहे आता
आयुष्याचे रोपटे  चिंतेने करपून गेले
 

गझल: 

प्रतिसाद

किलबिलणाऱ्या पक्ष्या देतो, मुठीमुठीने दाणे
गाणे त्याच्या ओठावरती  होते रुसून गेले
असे वाटते आहे.... (हा निरोप वाचावा..........)

कसा आगळा सुगंध आता जुईस येतो आहे
प्रेमाने या मातीला हे कोण कवळून गेले?... वा मस्तच
-मानस६