..शह..


..शह..
---------------------------------------------------
कधी वादळी,कधी तांडवी..निवांत होतो नहात मी.
चार आसवे तिने ढाळता..पुरात गेलो वहात मी..


रानोमाळी वा खडक़ाळी

..मजेत होतो सुखात मी.
संसाराच्या मोही पडता..पिसला गेलो गव्हात मी..

बुरुज राखले शर्थीने अन गनिमांची ही कत्तल केली

.
काय रणी शिष्टाई घडली..मुकाट गेलो तहात मी..

शंभरांत मी मिसळुनि गेलो

.पाचांचा दुस्वासच केला.
तिने घालता असे त्रांगडे..गणला गेलो सहात मी..

घरे फितुरी सफेदकाळी

,राजाला प्राणासम जपले.
हलता प्यादी काय कुठे ती,फुकाच गेलो शहात मी..

शब्द हमालाने रचली

,सुंदरसोपी अभंगगाथा.
मला बुडविता जळात तेव्हा,मनात गेले रहात मी..

तिचा पहारा माझ्याभवती

,का हे वेडे प्रेम तिचे?.
परिभ्रमण ते सालो-साली,उभा राहतो उन्हात मी..

लढती

-मरती वंशज माझे,नशीबी माझ्या फक्त हारणे.
घातक ठरते गीता त्याची,खिन्न रहातो पहात मी..

----- योगेश जोशी.

गझल: 

प्रतिसाद

सुंदरच! शेवटचा शेरही मला फार आवडला!!

कधी वादळी,कधी तांडवी..निवांत होतो नहात मी.
चार आसवे तिने ढाळता..पुरात गेलो वहात मी..

रानोमाळी वा खडक़ाळी..मजेत होतो सुखात मी.
संसाराच्या मोही पडता..पिसला गेलो गव्हात मी..

बुरुज राखले शर्थीने अन गनिमांची ही कत्तल केली.
काय रणी शिष्टाई घडली..मुकाट गेलो तहात मी.... हे शेर फर आवडले
-मानस६