ध्वस्त

ऐनवेळी संपल्या पणतीतल्या वाती
वाट सूर्याची पहाती खिन्न ह्या राती

 

बदलले आहेत सारे रंग दुनियेचे
पत्थरांचे गीत आता पाखरे गाती

 

माडीवरी माडी चढे लुच्च्या-लबाडांची१
कष्टणार्‍यांच्याच हाती येतसे माती

 

शाहणे झालेत बोके मिळवती लोणी
(फक्त त्यांनी माकडांशी जोडली नाती)

 

येईलही पाणी उद्या ह्या कोरड्या पाटास, पण२
ध्वस्त झाली आजची ही कोवळी पाती

 

खड्ड्यामध्ये पडणार ह्याची जाण ना कोणा३
म्होरक्यामागेच सारी मेंढरे जाती 

 

आजच्या रामामध्ये ना राम उरलेला
का पुन्हा मग मारुतीने फाडावी छाती?४



[१,२,३,४ ह्या ओळी वृत्तात नाहीत असे वाटते. कृपया योग्य ते बदल करावेत, ही विनंती विश्वस्त]

गझल: 

प्रतिसाद

आज अवतरलेत भटसाहेब से वाटे
वाचुनी गझलेतले मज शेर हे साती
म्होरक्यांचा शेर उत्तम.