निकष
जोडत जावे मोडत जावे सर्व निकष जगण्याचे
दृष्टिकोनही बदलत जाती स्वतःकडे बघण्याचे
कलागुणांनी युक्त आणखी विद्यामंडित व्हावे
ज्ञान नेमके कुठे सापडे राहतेच शिकण्याचे
फक्त नभाची शिवण उसवली कोसळलेले नाही
तिने खोचुनी पदर ठरविले ठिगळ पुन्हा शिवण्याचे
पोचवणारे पार पाडती चोख आपुली कामे
अपुल्या हाती केवळ उरते वेळेवर निघण्याचे
अब्रू किंवा जीव सख्याचा निवडायाच्या समयी
विचारपूर्वक तिने योजिले स्वतःलाच विकण्याचे
छोटी छोटी कामे मोठया प्रेमाने करताना
कारण नसते अपुल्यापाशी मोठेपण असण्याचे
जलाशयातुन उगवलीस नेसलीस टपटप पाणी
इथून झाले पर्व सुरू इतके सुंदर दिसण्याचे
जगावेगळा शिक्का माझा मीच बनविला आहे
हेच असावे गुपित मोहरा साधारण दिसण्याचे

गझल:
प्रतिसाद
गझलरसीक (not verified)
रवि, 03/08/2008 - 21:17
Permalink
अतीशय सुरेख .............
फक्त नभाची शिवण उसवली कोसळलेले नाही
तिने खोचुनी पदर ठरविले ठिगळ पुन्हा शिवण्याचे
अतीशय सुरेख .............
प्रमोद बेजकर
रवि, 03/08/2008 - 21:45
Permalink
छान
गझल आवडली.
जोडत जावे मोडत जावे सर्व निकष जगण्याचे
दृष्टिकोनही बदलत जाती स्वतःकडे बघण्याचे
फक्त नभाची शिवण उसवली कोसळलेले नाही
तिने खोचुनी पदर ठरविले ठिगळ पुन्हा शिवण्याचे विशेष आवडले.