.....न ऐकायचे
ठरवले मनाचे न ऐकायचे
कधीही कुठेही न गुंतायचे
सखी यायची श्रावणासारखी
रिते मेघही सावळे व्हायचे
किती तळघरे,तळघरामागुनी
पुन्हा खोल इतके न खोदायचे
कसे प्रेम करतात शिकवेन मी
उद्या ते धडे फक्त गिरवायचे
नवे ना घडे तेच ते तेच ते
जुने दिवस झेरॉक्स काढायचे
'कसे चाललंय'जर विचारे कुणी
खरे काय,नसतेच सांगायचे
'नको सत्य सांगूस सगळे मला
नवे भ्रम कुठे सांग शोधायचे'
किती गर्व,हव्यास अन वल्गना
अखेरीस मातीत मिसळायचे
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 31/07/2008 - 16:25
Permalink
सुरेख
ठरवले मनाचे न ऐकायचे
कधीही कुठेही न गुंतायचे
वा...वा...
सखी यायची श्रावणासारखी
रिते मेघही सावळे व्हायचे
फारच छान...दुसरी ओळ
किती तळघरे,तळघरामागुनी
पुन्हा खोल इतके न खोदायचे
मस्त
नवे ना घडे तेच ते तेच ते
जुने दिवस झेरॉक्स काढायचे
छान कल्पना...
नको सत्य सांगूस सगळे मला
नवे भ्रम कुठे सांग शोधायचे'
सुरेख
चित्तरंजन भट
गुरु, 31/07/2008 - 17:35
Permalink
नवे भ्रम कुठे सांग शोधायचे'
'नको सत्य सांगूस सगळे मला
नवे भ्रम कुठे सांग शोधायचे'
वाव्वा.. फार आवडला. एकंदर चांगली गझल आणि प्रदीपरावांशी सहमत.
अनंत ढवळे
शुक्र, 01/08/2008 - 10:06
Permalink
सुंदर
किती तळघरे,तळघरामागुनी
पुन्हा खोल इतके न खोदायचे
सुंदर शेर !!
समीर चव्हाण (not verified)
शनि, 02/08/2008 - 11:03
Permalink
व्वा
किती तळघरे,तळघरामागुनी
पुन्हा खोल इतके न खोदायचे
'नको सत्य सांगूस सगळे मला
नवे भ्रम कुठे सांग शोधायचे'
सुंदर